Rashmi Shukla Latest News Sarkarnama
मुंबई

रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांकडून दणका, तर न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदा फोन टॅप केले, असा आरोप त्यांच्यावर आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla)यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High court) दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे शुक्ला यांच्या विरोधात मुंबईत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा टेलिग्राफ कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. शुक्ला या एसआयडीच्या प्रमुख असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदा फोन टॅप केले, असा आरोप त्यांच्यावर आहे.

पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात (Pune Police) त्यांच्यावर फोन टॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्लांनी आपल्या विरोधात दाखल एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. (Rashmi Shukla latest news)

रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High court)दिलासा मिळाला आहे. २५ मार्चपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना (Pune Police) न्यायालयाने आदेश दिला आहे.

बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाला आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.

तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, ज्येष्ठ नेते तसेच सरकारी अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा ठपका त्यांच्यावर करण्यात आला होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना राज्य गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, ज्येष्ठ नेते तसेच सरकारी अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा ठपका त्यांच्यावर करण्यात आला होता.

रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. (ips officer rashmi shukla Another case registered in Mumbai)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT