Sanjay Raut on Kirit Somaiya:  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut on Kirit Somaiya: सोमय्यांच्या व्हिडिओ प्रकरणात फडणवीसांचा संबंध आहे का?

Maharashtra Politics : आतापर्यंत विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : कोविड घोटाळ्यात सुजित पाटकरांच्या अटकेवरून माझ्याकडे बोट दाखवले जाते. मग, आता आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणातील व्यक्ती पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळची आहे, म्हणून या घटनेत फडणवीसांचा संबंध आहे का, असा खोचक सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या व्हिडिओ प्रकरणात फडणवीसांना ओढण्याचा प्रयत्न केला आहे.

आतापर्यंत विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे ते विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. शिवसेना नेते अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन भाजपलाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, हे प्रकरण ताजे असतानाचसंजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या सुजित पाटकर यांनाही कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी गुरूवारी अटक करण्यात आली.

याबाबत माध्यमानी विचारले असता, संजय राऊत म्हणाले,"आता परवा एक अश्लील व्हिडिओ समोर आला, तो ज्या व्यक्तीचा होता ती व्यक्ती फडणवीसांच्या जवळची आहे. मग त्यात फडणवीसांचाही समावेश आहे का, उद्योजक गौतम अडाणी हे पतंप्रधान आणि भाजपचे निकटवर्तीय आहेत. मग त्यांचं काय?" अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुजित पाटकरांच्या अटकेवर पलटवार केला आहे.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या सुजित पाटकर यांना कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी गुरूवारी अटक करण्यात आली, यासंर्भात त्यांना विचारले असता, राऊत म्हणाले की, मुंबईतील जंबो कोविड सेंटरमधील डॉक्टर्स, परिचारकांनी कोरोना काळात रुग्णांची खूप सेवा केली. पण ते पाहून त्यावेळच्या विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे ते काही ठराविक लोकांनाच टार्गेट करत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT