Raj Thackeray
Raj Thackeray  sarkarnama
मुंबई

आम्ही फटाके वाजवणारच.. ; खोपकरांची भूमिका राज ठाकरे यांना मान्य आहे का?

सरकारनामा ब्युरो

MNS मुंबई : दोन वर्षांच्या कालावधीनंतर देशभरात मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. पण मुंबईमध्ये मध्यरात्रीपर्यंत तर काही ठिकाणी अगदी पहाटे पर्यंत फटाक्यांचे आवाज येत असल्याने काही मुस्लीम लोकांनी याबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. पण यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मनसे (MNS) नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत ज्यांना फटक्यांचा त्रास होत असेल त्यांनी देश सोडून जा अशा शब्दांत सुनावले.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत ज्यांना फटक्यांचा त्रास होत असेल त्यांनी देश सोडून जा अशा शब्दांत सुनावले आहे. ''ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा,'' असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

पण आता अमेय खोपकर यांची भूमिका राज ठाकरे यांना मान्य आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. याचे कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये फटाक्यांना विरोध करण्यात आला आहे. ब्ल्यू प्रिंटमध्ये पायाभूत प्रश्नांमध्ये पर्यावरणावर भूमिका मांडली आहे. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण होतं असा उल्लेख ब्ल्यू प्रिंटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे खोपकर यांनी ब्ल्यू प्रिंट वाचली नाही का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यावर आता राज ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे साडेचार वाजता त्यांच्या परिसरात फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. तर दूसऱ्या एका ट्विटमध्ये सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्री दोन वाजता कांदिवली गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचे ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी ट्वीटला उत्तर देत संबंधितांना कळवल्याचे उत्तर दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT