Ravindra Chavan | Eknath Shinde
Ravindra Chavan | Eknath Shinde 
मुंबई

Dombivali Politics : शिंदे-चव्हाणांमधील शीतयुद्ध संपले?

सरकारनामा ब्युरो

Dombivali Politics| डोंबिवलीत रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येणार असून ४४५ कोटींच्या विविध रस्त्यांच्या कामाचे भमिपूजन केले जाणार आहे. आता या भमिपूजन सोहळ्याचे बॅनर डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात लावण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे या बॅनरवर  कॅबिनेट मंत्री आणि डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांचा फोटो लावण्यात आला आहे आणि याची चर्चा आता सुरू झाली आहे. या आधी म्हणजे गेल्या तीन वर्षात खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या बॅनरवर कधीही भाजप आमदार रवींद्र चव्हाण दिसला नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. मंत्रालयापर्यंत हा वाद गेल्याचीही चर्चा होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अडीच वर्षांपूर्वी डोंबिवली शहरासाठी ४७२ कोटीचा निधी मंजूर केला होता.

ठाकरे सरकार काळात तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी रोखल्याच्या आरोप असा आरोप यापूर्वी चव्हाण यांनी होता. त्यामुळे शिंदे -चव्हाण यांच्यात सतत्याने खटके उडत होते. त्यामुळे रस्त्यांच्या माध्यमातून डोंबिवली शहराचा कायापालट करण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्या स्वप्न त्यामुळे भंग पावले. ठाकरे सरकारने हा निधी खुला करण्यासाठी अडीच वर्ष रवींद्र चव्हाण आटोकाट प्रयत्न करत होते. त्यांमुळे दोघांमध्ये चांगलेच खटके उडू लागले होते.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात दिलजमाई झाली. मु्ख्यमंत्र्यांनी डोंबिवलीसाठी ४७२ कोटींचा यापूर्वी मंजूर केलेला रस्ते कामांचा निधी पुन्हा खुला केला. त्यानंतर अखेर ४४५ कोटींच्या विविध रस्त्यांच्या कामाचे भमिपूजनाचा मुहूर्त मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT