Mumbai News : अभिनेता सुशांतसिंह राजपुत मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये रिया चक्रवर्तीविरोधात कोणताही पुरावा आढळून आला नाही, असा दावा सीबीआयने केला आहे. पण आता खासदार नारायण राणे यांनी सुशांतसिंहची हत्याच झाल्याचा दावा करत त्याचा व्हिडीओही नोकराने काढल्याचे म्हटले आहे. त्यावरून पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राणेंच्या या दाव्यानंतर वेगळाच संशय व्यक्त केला आहे दमानिया यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. विश्वास कोणावर ठेवायचा?, असा प्रश्न करत दमानिया यांनी नारायण राणेंच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाला पाच वर्षे झाली. केव्हा येणार यांची वेळ, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, नारायण राणे म्हणतात नोकराने सुशांतसिंहच्या हत्येचा व्हिडीओ केला आहे. वेळ आल्यावर पुरावे सादर करेन. मग अजून सादर का नाही केले पुरावे, असा प्रश्न पडतो. 5 वर्ष झाली या प्रकरणाला, केव्हा येणार यांची ‘वेळ’? का हे भाजपचे केवळ दबावतंत्र आहे?, असे प्रश्नही दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.
हे खरं असेल तर काल CBI ने Closure Report कसा दाखल केला. प्रत्येक गोष्टीचे राजकारण असल्याचेही दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला काहीच व्हॅल्यू नसल्याचे म्हटले आहे.
क्लोजर रिपोर्ट म्हणजे रिया चक्रवर्तीला क्लिन चीट नाही, असेही ते म्हणाले आहेत. कोर्टाकडून क्लोजर रिपोर्ट फेटाळला जाऊ शकतो. कोर्ट पुन्हा चौकशीचे आदेश देऊ शकते. सुशांतच्या वडिलांकडून पुन्हा कोर्टात याचिका दाखल झाल्यास त्यावर कोर्ट आदेश देऊ शकते, असेही ते म्हणाले आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.