Shiv Sena Bhavan
Shiv Sena Bhavan  Sarkarnama
मुंबई

ठरलं.. सेना भवनापासून हाकेच्या अंतरावर सुरू होणार शिंदे गटाचे शिवसेना भवन

सरकारनामा ब्यूरो

मंबई : गेले अनेक दिवस मंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून शिवसेना भवन उभारण्याची चर्चा सुरू होती. अखेर या प्रतिशिवसेना भवनाची जागा निश्‍चित झाली आहे. दादरच्या शिवसेना भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वास्तू सेंटरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना भवन (Shivsena Bhavan) लवकरच सुरू होणार आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी या शिवसेना भवनाचे उदघाटन करण्याची तयारी सुरू आहे. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यात अनेक राजाकीय घडामोडी घडत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट मोठ्या तयारीने उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या तयारीचा भाग म्हणून लवकरच शिवसेना भवन सुरू करण्यात येणार आहे.

शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. दादरमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटात शनिवारी मारामारी झाली. या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत.या प्रकरणात एकिकडे आमदार सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.तर जामीन मिळालेल्या सहा शिवसैकिांसोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोटो काढल्याने वातावरण गरम आहे.

पुणे-मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटात अधून-मधून वातावण तंग होत आहे. मुंबईतील गेल्या दोन दिवसातील वातावरण तर अधिकच संघर्षाचे झाले होते. या पाश्‍रभूमीवर दसरा मेळाव्याचा वाद वाढू नये, याची काळजी दोन्ही बाजूंनी घेण्याची गरज आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होईल याचा निर्णय मुंबई महापालिकेचे घ्यायचा आहे. हा निर्णय झाल्यानंतर वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT