Maharashtra Cabinet Expansion : Sarkarnama
मुंबई

Cabinet Expansion News : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर? कारण आले समोर!

Ajit Pawar, Devendra Fadnavis News : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाकडून चांगल्या खात्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आधी खातेवाटपाबाबत चर्चा केली जाईल आणि नंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबवणीवर पडणार असल्याचे लक्षात येताच शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढत आहे. गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांच्यासह आलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचा थपत विधी झाला. मात्र, शिंदे गटातील आणि भाजपामधली इच्छूक अजूनही वेटिंगवरच आहेत.

अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे युती सरकार आणखीच मजबूत झाले, असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून केला जात आहे. मात्र, यावरून आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहे. काहीही करा पण अजित पवार यांना अर्थ खाते देऊ नका, अशी भूमिका शिंदे गटातील आमदारांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आणि नंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मोठी खाती सांभाळलेली आहेत. त्यामुळे त्यांना साजेसे मंत्रिपद मिळावे, अशी मागणी अजित पवार यांनी केल्याचे समजते. याशिवाय राष्ट्रवादीचे मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. याला भाजपाच्या (BJP) आमदारांनी विरोध केल्याचे सांगितले जात आहे. सध्या तिन्ही नेते आपआपल्या आमदारांची समजूत काढत असल्याची माहीत आहे.

दरम्यान, सोमवारी रात्री 'वर्षा' बंगल्यावर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत खाते वाटपावर प्रदीर्घ चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत तिन्ही नेत्यांनी भाजप-शिवसेना (Shivsena)-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कसे खाते वाटप करायचे याचा फॉर्म्यूला ठरवला. मात्र, आता हा फॉर्म्यूला शिंदे गटातील काही आमदारांना मान्य नसल्याचे सांगितले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT