Chitra wagh
Chitra wagh  Sarkarnama
मुंबई

"एकेकाळी नथुरामचे पुतळे उभारू म्हणणारे हेच ते छगन भुजबळ!"

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीवर केलेल्या वक्तव्यावरून आता भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. "सरस्वतीने आम्हाला शिकवलं नाही, मग शाळेत सरस्वतीची पूजा का करायची?" असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. ब्राम्हण महासंघानेही भुजबळांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतले होते. आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भुजबळांवर जोरदार टिका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत भुजबळांना लक्ष केले. नथुराम गोडसेचे पुतळे उभे करू, असे भुजबळांनी म्हंटले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. आपल्या ट्विटमध्ये वाघ म्हणतात की, "एकेकाळी नथुरामचे पुतळे उभारू असे म्हणणारे भुजबळ साहेब हेचं. क्रांतीज्योती सावित्रीमाईंची पूजा करायला हवी पण सरस्वतीला विरोध कशासाठी ?ते ज्या साडेतीन टक्क्याबद्दल बोलतायत, त्यातल्याच एकाच्या भिडे वाड्यात सावित्री माईंची शाळा भरली होती, हे सोयीस्कर विसरायचं का..? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते छगन भुजबळ ?

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या कार्यक्रमात मंचावरून संबोधित करताना, भुजबळ यांनी सरस्वतीवरुन वक्तव्य केले होते. शाळेत सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळ यांनी विचारला होता. सरस्वतीने आम्हाला शिकवलेले नाही, असंही भुजबळ म्हणाले होते.

देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? फक्त 3% लोकांना सरस्वतीने शिकवले. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा, अशी मागणीही भुजबळांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT