Uday Samant, Eknath shinde
Uday Samant, Eknath shinde sarkarnama
मुंबई

Mumbai : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, याची कुणकुण होती... उदय सामंत

सरकारनांमा ब्यूरो

मुंबई : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार याची कुणकुण लागली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री व्हायलाच आमची भाजपसोबत युती होतेय का, असे मनातच वाटत होते. मला त्याची जाणीव सुरवातीलाच झाली होती, अशी माहिती माजी मंत्री व मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी दिली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बंडखोरीमागच्या काही गोष्टी उघड केल्या. सामंत म्हणाले, एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होतील, याची मला कुणकुण लागली होती. मला सातत्याने त्याची जाणीव होत होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री व्हायलाच ही भाजपसोबत युती होतेय का, असे मला मनातूनच वाटत होते. नेमके तसेच झाले, असे त्यांनी स्पष्ट केले.

या नव्या मंत्री मंडळात तुम्ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आजी होणार की माजी होणार या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस साहेब ठरविणार आहेत. महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळाली तर मी कधीही तयार आहे.

इतर पक्षात प्रवेश करण्याची वेळ आली तर कोणत्या पक्ष निवडाल. जसे मनसे, भाजप की प्रहार असे विचारले असता श्री. सामंत म्हणाले, अशी वेळ येणार नाही. विधीमंडळामध्ये अध्यक्षांनी अंतिम केला आमचा पक्ष आम्ही सोडणार नाही. विधानसभा अध्यक्षांनी महाराष्ट्र विधीमंडळ गट नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना जाहीर केलेले आहे. आमचा गट हा शिवसेनेचा व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT