मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ट्विट करत महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाई होणार असल्याचे ट्वीट केले होते. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करत राष्ट्रवादीलाच डिवचले आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांनाच ट्विटच्या माध्यमातून आव्हान दिले आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी अनेक मुद्द्यावरुन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आता मोहीत कंबोज यांनीही ट्विट करत, 'विद्याताई जय श्रीराम' असे म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर आता राजकीय वर्तुळात नेमकं काय होणार याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.
गुजरात न्यायालयाने बिल्कीस बानो प्रकरणात 11 जणांची सुटका करण्यात आली. त्यानंतर विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. राष्ट्रवादीच्या या भूमिकेनंतरच कंबोज यांनी ट्वीट केलं आहे. गुजरात दंगली दरम्यान बिल्कीस बानो यांच्यावर ११ जणांनी अत्याचार केला. गुजरात न्यायालायाने मात्र या प्रकरणातील 11 जणांची सुटका केली. धक्कादायक म्हणजे त्यांच्या सुटकेनंतर त्यांना हारतुरे घालून मिठाईही भरवण्यात आली. याविरोधा विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत टीका केली होती.
प्रत्येक स्रीचा धर्म हे तिचं चारित्र्य आहे. त्यावर जर कुणी हल्ला करत असेल मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कुणाला हा अधिकार नाही. मर्दाला लढायचं असेल तर त्याने मैदानात लढावं. महिलांवर बलात्कार करून जर कुणी मोठेपणा मिरवत असेल, तर त्याला आम्ही विरोध करणार, असे सांगत राष्ट्रवादीतर्फे येत्या 27 तारखेला या विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विद्या चव्हाण यांनी केला होता. या इशाऱ्यानंतरच मोहित कंबोज यांनी हे ट्विट केल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.