Sai Resort Scam :
Sai Resort Scam :  Sarkarnama
मुंबई

Sai Resort Scam : अनिल परबांना दुसरा झटका; साई रिसॉर्ट प्रकरणी जयराम देशपांडेंना अटक

सरकारनामा ब्युरो

Sai Resort Scam : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडेंना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा देशपांडे यांच्यावर ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात य़ेणार आहे. दोन दिवसांपूर्वीच अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे.

दापोलीतील साई रिसोर्टप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. आता या प्रकरणात १० मार्चला अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदमांना ईडीने अटक केली.कदम यांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्याची मागणी 'ईडी'ने केली होती.'ईडी'चा युक्तीवाद कोर्टाने मान्य करत कदम यांना चौकशीसाठी १५ मार्चपर्यंत 'ईडी'ची कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने दापोलीतील साई रिसॉर्टवरून अनिल परब यांना लक्ष्य करत आहेत. असे असतानाच प्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांचं शासनाकडून निलंबन करत चौकशी सुरु केली होती. पदावर असताना अनियमिततेच्या आरोपाखाली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

साई रिसॉर्ट बांधकाम, जमीन हस्तांतरण प्रकरणी अनिल परबांवर आरोप केला जात आहे. मात्र, माझा या रिसॉर्टशी संबंध नाही. जो व्यवहार झाला तो कागदोपत्री झाला आहे. मी ही जागा सदानंद कदम यांना दिली आहे, असे अनिल परबांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वीच कुडोशी येथील अनिकेत फार्म हाऊस या सदानंद कदम यांच्या निवासस्थानी 'ईडी'चे पथकाने ताब्यात घेतले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची खेडमधील सभा यशस्वी करण्यासाठी सदानंद कदम यांचा पुढाकार होता. म्हणूनच सुडबुद्धीने ही कारवाई झाली असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT