Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

आदित्य ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात; सुशांतसिंहचा फॅन असल्याचा दावा

सायबर पोलिसांनी आरोपीला बंगलुरू येेथून अटक केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुबंई : शिवेसनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर सेलने (Cyber Cell) अटक केली आहे. जयसिंग राजपूत (Jaisingh Rajput) असं त्याचं नाव असून तो अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) फॅन असल्याचा दावा करत आहे. कर्नाटकातील बंगलुरू येथून जयसिंगला ताब्यात घेण्यात आलं आहे.

जयसिंग राजपूत याने आदित्य ठाकरेंना धमकीचे व्हॉट्सअॅप मेसेज पाठवले होते. यातील एका मेसेजमध्ये त्याने ठाकरे यांच्यावर सुशांतसिंहच्या हत्येचा आरोप केला आहे. ता. 8 डिसेंबर रोजी मध्यरात्री ठाकरे यांना सुरूवातीला एक मेसेज आला. त्यामध्ये हा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याने तीन फोन केले. पण ठाकरेंनी ते फोन घेतले नाहीत.

त्यानंतर आरोपीने आदित्य यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी हा बंगलुरू येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांचे पथक बेंगलुरू येथे रवाना झाले. तिथेच त्याला अटक करण्यात आली.

तुम्ही सुशांतसिंह राजपूतला मारले आता पुढचा नंबर तुझा असेल, असं आरोपी आदित्य ठाकरे यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते. काही मेसेजमध्ये ठाकरे यांच्याविषयी त्याने अपशब्दही वापरले होते. तो स्वत:ला सुशांतसिंहचा फॅन असल्याचे सांगत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT