Vijay Wadettiwar, Vonod Patil Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation Protest : जालन्यातील लाठीमारीतून काँग्रेस-भाजपमध्ये खडाखडी; वडेट्टीवार-विनोद पाटील भिडले

उत्तम कुटे

Mumbai Political News : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमारानंतर प्रत्येक राजकीय पक्षांचे नेते आंतरवली- सराटी गावी भेट देत आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी रात्री उशिरा आंदोलकांची भेट घेऊन जाऊन आले. त्यावेळी त्यांनी या महिन्यात बोलावण्यात आलेल्या संसदेच्या अधिवेशनातच कायदा करुन मराठा आरक्षण देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. यानंतर भाजपच्या वतीनेही त्यांच्यावर पलटवार केल्याने भाजप-काँग्रेसमध्ये जालना घटनेवरून खडाखडी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

विजय वडेट्टीवारांच्या मागणीचा समाचार मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांनी लगेच घेतला. "एक देश,एक निवडणूक या खास विषयावर संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. त्यामुळे त्यात मराठा आरक्षणाचा विषय कसा घेता येईल', असा प्रश्न उपस्थित करून पाटलांनी वडेट्टीवारांवर पलटवरा केला आहे. ते 'सरकारनामा'शी बोलत होते. यावेळी त्यांनी '५० टक्क्यांवर आरक्षण देता येणार नाही, अशी घटनादुरुस्त करून मराठा आरक्षणाला मजबूत खुंटी मारलेले केंद्र सरकार पुन्हा त्यात बदलाचा कायदा आणून मराठा आरक्षण देईल का', याविषयीही शंका व्यक्त केली.

वडेट्टीवरांवरांचा समाचार घेताना विनोद पाटील म्हणाले, 'मराठा आरक्षणावर काँग्रेस आमदारांनी राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यास आपण सांगावे. संसदेचे हे खास अधिवेशन बोलावण्यासाठी राहुल गांधी यांना आपण सांगावे. त्यासाठी त्यांना हा विषय किती गंभीर आणि महत्वाचा आहे, हे पटवून द्यावे', अशी अपेक्षावजा मागणी पाटलां वडेट्टीवारांकडे केली आहे.

'या दोन्ही अधिवेशनात कोण मराठा समाजाच्या मागणीला विरोध करतो ते स्पष्ट होईल. जो विरोध करेल त्यास त्याची जागा दाखवली जाईल; पण त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आम्ही आपल्या सोबत असू, असा शब्द देत पाटलांनी वडेट्टीवारांना टोलाही लगावला आहे. दरम्यान, मराठा आऱक्षण आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम मुजोर राज्य सरकारने केल्याचा हल्लाबोल वडेट्टीवारांनी आंतरवली-सराटीला भेट दिल्यानंतर केला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT