Congress Leader Nana Patole
Congress Leader Nana Patole Sarkarnama
मुंबई

काँग्रेस आक्रमक! नाना पटोलेंनी पक्षाच्या मंत्र्यांनाच दिले आदेश

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या मंत्र्यांचे जनता दरबार होणार आहेत. या जनता दरबाराच्या नियोजनासाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. (Congress Latest News)

प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष या समन्वय समितीचे निमंत्रित असून प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार व प्रमोद मोरे यांच्याकडे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष एम. एम. शेख, सुभाष कानडे, सरचिटणीस हुस्नबानो खलिफे, रमेश शेट्टी, चंद्रकांत पाटील, चिटणीस सचिन गुंजाळ, संतोष केणे, यशवंत सिंह ठाकूर, राहुल दिवे या समितीचे सदस्य आहेत. तर अॅड. विनय राणे आणि रवींद्र परटोले हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील.

उद्या गुरुवार (ता. १२ मे) रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा जनता दरबार होणार आहे. शालेय शिक्षण विभागाशी संबंधित ज्यांच्या काही समस्या असतील त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मंत्र्यांचे जनता दरबार होत असतात. त्याच धर्तीवर आता काँग्रेसनेही जनता दरबार सुरु केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT