Javed akhtar  sarkarnama
मुंबई

Javed Akhtar : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना न्यायालयाचे समन्स ; काय आहे कारण?

Javed Akhtar : ६ जानेवारी रोजी न्यायालयात होणार्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश...

सरकारनामा ब्यूरो

Javed Akhtar : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना आरएसएसची तुलना तालिबानशी करणं भोवलं असून न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहेत. पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. यामुळे जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार अस्तित्वात आले होते. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत दिली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तालिबानशी तुलना केली होती.

संघाची विचारसरणी तालिबानींसारखी आहे, आरएसएस लोकांची दिशाभूल करते, त्यांचे मानसिक खच्चीकरण असल्याचे असा आरोप अख्तर यांनी त्यावेळी केला होती. याच वक्तव्यानंतर आरएसएसचे कट्टर समर्थक अॅड. संतोष दुबे यांनी मुलंड येथील फौजदारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. अख्तर यांच्या विधानामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असल्याचा आरोप देखील यावेळी दुबे यांनी केला होता.

अॅड. संतोष दुबे यांनी दिलेल्या तक्रारीत जावेद अख्तर यांच्या विधानामुळे संघाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असल्याचा आरोप केला होता. त्यांनी अख्तर यांनी राजकीय हेतूने आरएसएसच्या नावाचा अनावश्यकपणे वापर केला असल्याचेही दुबे यांनी म्हटले होते.

आता त्याचीच दखल घेऊन मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने अख्तर यांना मंगळवारी समन्स बजावले आणि ६ जानेवारी रोजी न्यायालयात होणार्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT