Devendra Fadnavis, Jayant Patil
Devendra Fadnavis, Jayant Patil sarkarnama
मुंबई

'देवेंद्र फडणवीसांना हे सरकार चालवण्यात रस नाही!'

सरकारनामा ब्यूरो

रश्‍मी पुराणिक

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सध्याच्या सरकारमध्ये फार रस नाही, त्यांचा या सरकारमधून रस कमी झालाय. हे माझे विधान नसून निरीक्षण असल्याचे, मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांच्या यांनी दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. साम वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात पाटील बोलत होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, अब्दुल सत्तार यांचे सुप्रिया सुळे यांच्याबाबतचे वादग्रस्त विधान, तसेच कालचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे फडणवीसांना मान्य आहेत का? हे त्यांना विचारले पाहीजे, हे त्यांना मान्य असू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये आपण चुकीचे पाऊल टाकले आहे, 2024 पर्यंत विरोधात राहीलो असतो तर कुठंतरी सरकारमध्ये आलो असतो. मात्र, आता ती शक्यता देखील नाही, हे आता भाजपला कळून चुकलेले आहे, असा चिमटा त्यांनी भाजपला काढला.

भाजपने आमदारांची फोडाफोडी करून आणलेले सरकार जनतेला मान्य नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत जनतेच्या मनात आजही चांगली अस्था आहे. भाजपने या पूर्वी असे कधी केले नव्हते. मात्र, भाजपने (BJP) तब्बल 9 राज्यातील सरकार पाडली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला भाजप आणि राज्यातील सरकारबाबत अस्था राहीलेली नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकार महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये ओढून नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. वेदांतासाठी आपण गुजरात पेक्षा जास्त सवलती दिल्या होत्या. मात्र, तरी देखील प्रकल्प गेला. दु:ख हे आहे की जवळपास 4 लाख लोकांना रोजगार मिळाला असता. मात्र, प्रकल्प तिकडे गेल्यामुळे आपल्या राज्याला मोठा फटका बसल्याचे पाटल यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT