Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad: अजितदादांना 'या' गोष्टी कशा खपतात? आव्हाडांचा सवाल; वाल्मिकने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात...

Jitendra Awhad attacked on Ajit Pawar over santosh deshmukh murder investigation: अजितदादा पवार हे संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणे व्हायला लागले आहे.

Mangesh Mahale

एका कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड सध्या सीआयडी पोलीस कोठडीत आहे. पुण्यात सीआयडी पोलिसांना शरण येताना कराडने जी गाडी वापरली होती, त्या गाडीची चर्चा सध्या सुरु आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा मस्साजोगमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्या ताफ्यात ही गाडी होती, असा दावा बीडचे खासदार बजरंग सोवनणे यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत सोशल मीडिया x वर पोस्ट शेअर करीत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात? असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

"ज्या गाडीतून वाल्मिक अण्णा कराड साहेब सीआयडी ऑफिसच्या दारात उतरले अन् ताठ मानेने आतमध्ये गेले; त्या गाडीचे गुपीत बीडचे खासदार बजरंग अण्णा सोनावणे यांनी उघड केलेय. त्यांनी उघड केलेले गुपीत अधिकच धक्कादायक आहे. अजितदादा पवार हे जेव्हा मस्साजोग म्हणजेच संतोष देशमुख यांच्या गावी गेले होते. तेव्हा हीच गाडी त्यांच्या ताफ्यात होती. हे प्रकरण आता इतके किचकट आणि किळसवाणे व्हायला लागले आहे की सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण होईल," असे आव्हाडांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांवर टोमणा हाणला आहे. "अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत, अशी त्यांची प्रतिमा आहे. मग, त्यांना या गोष्टी कशा काय खपतात?आज जे काही मला कळले ते आणखी धक्कादायक होते. पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली. त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला. त्या इसमाचे नाव बालाजी तांदळे! तो एका गावाचा सरपंच आहे. मात्र, याही पेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, दोन पत्रकारांनी मला असे सांगितले की, "आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय. आम्ही उद्या मुंबई, पुण्याला निघून जाऊ , कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने आमच्या मागे लागले आहेत." वा रे... वाह ! आधुनिक महाराष्ट्," असे आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेले प्रश्न

अजित पवार यांच्या मस्साजोग येथील भेटीच्या दौऱ्यात वाल्मिक कराडची गाडी असेल, तर मग याचा अर्थ काय? गाडी कोणाच्या नावावर आहे? असा प्रश्नही बजरंग सोनावणे यांनी उपस्थितीत केला. परळीतून पुणे त्यानंतर गोवा आणि पुन्हा पुणे असा वाल्मिक कराडचा प्रवास सुरु असताना पोलीस काय करत होते? 15 डिसेंबरला नागपूरात हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशी वाल्मिक कराड नागपूरातच होता, असा दावाही बजरंग सोनवणे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT