Shivshakti-Bhimshakti Alliance
Shivshakti-Bhimshakti Alliance 
मुंबई

Shivshakti-Bhimshakti Alliance : शिवशक्ती-भिमशक्ती युतीचे राष्ट्रवादीचा हिरवा कंदिल; जितेंद्र आव्हाड म्हणतात...

सरकारनामा ब्युरो

Shivshakti-Bhimshakti Alliance : प्रकाश आंबेडकरांनी युतीत येण्याचा निर्णय घेतला तर तो दुग्धशर्करा योग असेल, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यातून शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या युतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) हिरवा कंदिल दिलाय का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात नवी राजकीय समीकरणे जुळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेबरोबर (Shivsena) आघाडी करण्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अखेर तयारी दर्शवली आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, राष्ट्रवादीसोबत जाण्यास त्यांनी सक्त विरोध दर्शविला होता. मात्र, आता ते राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास तयार आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. आव्हाड म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या निर्णय प्रक्रियेतील नेता नाही. पण सामाजिक दृष्टीकोनातून जेव्हाराजकारणाकडे पाहिले तर, प्रकाश आंबेडकर यांनी युतीत येण्याचा घेतलेला निर्णय हा दुग्धशर्करा योग असेल. महाराष्ट्रात सध्या धर्मांधता, जातीय द्वेष वाढत चालला आहे. अशा काळात प्रकाश आंबेडकरांनी समविचारी पक्षांसोबत जातोय, असं सांगणे हे खूप ताकदीचं आहे.''

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ?

अमरावतीमध्ये बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेला वाटतंय की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो महाविकास आघाडीतील पक्षांचा विषय आहे. आम्ही शिवसेनेला म्हटलं आहे की, तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या, आम्ही त्यांचंही स्वागत करू. राष्ट्रवादीला त्यांनी आणलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू. ज्या दिवशी त्यांचा याबाबतचा निर्णय होईल. त्या दिवशी शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT