Jitendra Awhad
Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : आव्हाडांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकविण्यात मनसेच्या बड्या नेत्याचा हात ?

सरकारनामा ब्युरो

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'हर हर महादेव'सिनेमावर आक्षेप घेऊन ठाण्यात विवियाना मॅालमध्ये गोंधळ घातला होता. या प्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या समर्थकांना पोलिस ठाण्यासमोर मोठा राडा केला होता. याप्रकरणी आव्हाडांनी गंभीर आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी टि्वट करीत त्यांच्यावर कुणाच्या आदेशाने हा प्रकार झाला होता, याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Jitendra Awhad latest news)

"हर हर महादेव' चित्रपटादरम्यान विवियाना येथे झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले,"असे आव्हाड यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटल आहे.

आव्हाड आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "मी त्या ताईचा आभारी आहे, कि त्या ताईने स्वत:हून सांगितले, कि मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा,"

मुंब्रा येथे महिलेचा विनयभंग असे गुन्हे दाखल झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी हा सर्व प्रकार पूर्वनियोजित योजना असल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्हिव्हियाना मॉलमध्ये जात हरहर महादेव या चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. त्यावेळी संबंधित व्यक्तीची महिलाही त्याठिकाणी उपस्थित होती. या महिलेने माझ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी काही स्थानिक राजकारण्यांचे प्रयत्न सुरु होते, असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT