Jitendra Awhad
Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

मतदान केंद्रात काय घडलं? आव्हाडांनी सगळ काही सांगून टाकलं!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) मतदान करत असताना महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी पोलिंग बुथवर बसलेल्या पोलिंग एजंटला मतदान केल्यानंतर मतपत्रिका दाखवण्याऐवजी हाताळायला दिली, असा आक्षेप भाजपने (BJP) घेतला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जयंत पाटील यांच्या हातात मत पत्रिका दिली, असा आरोप भाजपने केला आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Rajyasabha Election 2022 News Updates in Marathi)

आव्हाड मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राला हे माहित व्हावे मी काय केले. महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करत आहे. बातम्या ऐकून गैरसमज होईल. म्हणून मी खुलासा करत आहे. मी साधारण बारा ते साडे बारा वाजता विधान भवनात आलो. विधानभवनात उपमुख्यमंत्री कार्यालयात गेलो, त्यांनी मला काय काय सूचना करायची ती केली. त्यानंतर मी मतदानासाठी गेलो. मी मतदान केले. मतदान दाखवायचे असते ते मी दाखवले. मी पाठमोरा होता, कॅमेरा माझ्या मागे होता. मतदान पत्रिका माझ्या हातात होती, ती मी जयंत पाटील (Jayant Patil) यांना दाखवली. हातात देण्याचा प्रश्नच नाही. जयंत पाटील समोर बसले होते. त्यामुळे त्यांना ती दिसली. त्यानंतर मी मतदान टाकले आणी बाहेर आलो. जी मतदानाची प्रक्रिया आहे ती केली आहे.

सर्व चॅनेल मागील साडे चार तास जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर आक्षेप आहे असे चालवत आहेत. मी मतदान करायला गेलो. मतदान करून बाहेर आलो. त्यानंतर आक्षेप घेण्यात आला. माझ्या मतावर आक्षेप घेण्यात आला हे मला माध्यंमामधून कळाले. मी मतदानाची जी प्रक्रिया केली. त्यातून काही चूक झाली आणि मत बाद व्हावे असे काही झाले, असे मला वाटत नाही. कारण नसताना हे खेळ करायचे हे बरोबर नाही. माझ्या हातून मतदानाचा ब्रिज झाला नाही. मी जर मतदाना जयंत पाटील यांना दाखवले नसते तर माझ्या पार्टीने मला सहा वर्षे निलंबित केले असते. पण तसे मी काही केलेले नाही.

दुर्दैवाने राज्याला वेठीस धरले जात आहे. मला काही कळत नाही का आक्षेप घेतला गेला. मी खूप विचार केला कुणाशी काही बोललो नाही. आम्ही कुठे चुकलेलो नाही हे मला राज्याला सांगावेसे वाटत आहे. मी माझे स्पष्टीकरण न्यात व्हावे यासाठी आलो. टीव्ही चॅनल भाजप रवी राणा यांच्यावरील आक्षेप दाखवत नाही. पण माझ्याबद्दलचे दाखवते आहे. मला का टार्गेट केले जात आहे याबद्दल काहीच माहीत नाही.

कारण नसताना हे खेळ दूर घेऊन जायचे आहेत. माझ्या हातून कोणतीच चूक झाली नाही. कॅमेऱ्यामध्ये काहीच दिसत नाही. समोरच्या पार्टीकडूनही मी माहिती घेतली आहे. जयंत पाटील यांनी हात लावला हे कसे दिसले. वरती कॅमेरे लावले होते का? असा सवाल आव्हाड यांनी केला. मला आश्चर्य वाटते, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT