Sharad Pawar| Narendra modi
Sharad Pawar| Narendra modi Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: NDA सोबत सामील व्हा; केंद्रीय मंत्र्याची शरद पवारांना खुली ऑफर

सरकारनामा ब्युरो

Sharad Pawar-BJP : राज्यात झालेल्या महासत्तांतरानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळंचं वळण लागलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.असे असले तरीही राज्यातील अस्थिरता कायम आहे. या सत्तासंघर्षावर कायमचा तोडगा निघावा, अशी अपेक्षा असतानाच एका केंद्रीय मंत्र्याने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएसोबत येण्याची ऑफर दिली आहे. (Join with NDA; Union Minister's open offer to Sharad Pawar)

देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी एनडीए सोबत यावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. अनेकदा पंतप्रधान शरद पवार यांचं कौतूकही करत असतात. त्यामुळे आता शरद पवारांनी एनडीए सोबत यावं, अशी खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे.

यावेळी त्यांनी रामदास आठवलेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. पण त्यांनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये. मशिदींवरील भोंगे उतरण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावं आणि चांगलं काम करून आपला पक्ष वाढवावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

तसेच, आज बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. शिवसेना गमावण्याची वेळ आली नसती. पण याला सर्वस्वी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच जबाबदार आहेत, असही आठवलेंनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT