मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची प्रकरणात आज मोठी घडामोड घडली आहे. देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी (hearing) घेण्यास न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नकार दिला आहे. आपण वैयक्तीक कारणांमुळे या प्रकरणाची सुनावणी घेऊ शकत नाही, त्यामुळे दुसऱ्या न्यायमूर्तीकडे दाद मागण्यात यावी, असे निर्देश डांगरे यांनी दिले आहेत. (Judge's refusal to hear Anil Deshmukh's bail application)
आमदार अनिल देशमुख यांना ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांनी सीबीआयच्या प्रकारणातही दिलासा मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, या प्रकारणात देशमुखांना मोठा धक्का बसला आहे. कारण, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयतील न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नकार दिला आहे. आपण वैयक्तीक कारणामुळे या प्रकारणाची सुनावणी घेऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही इतर न्यायमूर्तींकडे दाद मागावी, असेही डांगरेंनी सूचविले आहे.
दरम्यान, यापूर्वी न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी अनिल देशमुख यांची सुनावणी नाकारली होती. यापूर्वी देशमुख यांच्याशी कोणत्या तरी प्रकरणात वकील म्हणून माझा संबंध आलेला असू शकतो, त्यामुळे नैतिकता म्हणून त्यांच्या प्रकारणावर आपण सुनावणी देणे योग्य होणार नाही, असे सांगून न्यायमूर्ती डांगरे यांनी देशमुख यांच्याबाबतची सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
देशमुख यांच्या वकिलांना आता दुसऱ्या न्यायमूर्तीकडे दाद मागावी लागणार आहे. अन्यथा हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जावे लागेल. त्यानंतर रजिस्ट्री त्यांना खंडपीठ किंवा दुसऱ्या बेंचचा पर्याय सुचविण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडणार आहे, हे आता स्पष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.