Sanjay raut sujit patkar .jpg Sarkarnama
मुंबई

Covid Center Scam: मुंबई 'कोविड सेंटर घोटाळा'प्रकरणी मोठी अपडेट; सोमय्यांनी अडकवलेला राऊतांचा निकटवर्तीय 2 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर येणार

Sujit Patkar BMC Covid Center Crime : बीएमसीने नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने सुजीत पाटकर यांच्यावर केला होता

Deepak Kulkarni

Mumbai News : कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.मुंबई पोलिसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय असलेल्या सुजित पाटकर यांना कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी यांना अटक केली होती. आता पाटकर यांना तब्बल दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर आता न्यायालयानं बुधवारी (ता.16) जामीन मंजूर केला आहे. हा राऊतांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीत सोमय्या यांनी सुजित पाटकर यांच्यावर 36 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. आता याप्रकरणी न्यायालयानं दोन लाखांच्या जात मुचकल्यावर पाटकर यांना जामीन मंजूर केला आहे.

आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह संजय राऊतांसाठी न्यायालयाचा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.

दरम्यान,सुजित पाटकर यांना ईडीने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात या पूर्वीच अटक केली होती. या कारवाईनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. ईडीच्या कारवाईनंतर मुंबई पोलिसांनी पाटकर यांना दाब्यात घेतल्यामुळे तपासाची चक्र वेगानं फिरल्याचं दिसून आलं होतं.

बीएमसीच्या जंबो कोविड-19 केंद्र चालवण्यासाठी नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटदारांनी फसवणूक करून पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने पाटकर यांच्यावर केला होता. त्यावेळी सुजीत पाटकरांची अटक हा संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का होता.

कोविड सेंटरचे कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीने पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नाहीत, असे ईडी चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे. त्या संदर्भात मुंबई पोलिसही तपास करत होते. त्यानंतर पोलिसांनी पाटकर यांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, कोविड सेंटर घोटाळ्याच्या आरोपांमुळे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पडणेकर यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे. यामुळे ठाकरे गटाची डोखेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT