Kailas Patil, Tanaji Sawant
Kailas Patil, Tanaji Sawant sarkarnama
मुंबई

तानाजी सावंतांकडून कैलास पाटलांची पोलखोल...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कैलास पाटील हे मिडियाची दिशाभूल करत असून त्याच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही. ज्याने पक्षप्रमुखांची गेली अडीच वर्षे दिशाभूल केली, तशीच माझीही दिशाभूल केलेली आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे.

गुजरातमध्ये आपल्यावर कसा अन्याय करण्यात आला हे कैलास पाटल यांनी सांगून मिडियावर झळकण्याचा प्रयत्न केला. त्याचा पोलखोल आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे. आमदार सावंत म्हणाले, विधान परिषदेच्या मतदानादिवशी मतदान झाल्यानंतर कैलास माझ्याजवळ आणि आपल्याला नंदनवनला जायचे आहे. मला काहीच माहिती नव्हती. कारण माझा चार दिवसांपूर्वी अपघात झालेला होता.

आमच्या गाडीतून आम्ही नंदनवनला निघालो. त्यानंतर भाईंशी चर्चा झाली. पुढे जात असताना त्याची व्हॉटसअप, मोबाईलवरून संपर्क चालू होता. तेथून निघाल्यावर गुजरातच्या तपासणी नाक्यावर आल्यावर मला लघुशंकेला जायचे असे त्याने सांगितले. त्यानंतर खाली उतरविले व चर्चा करूया असे म्हटला. त्यानंतर आपल्याला इकडे जाऊन चालणार नाही, माघारी गेले पाहिजे. मला भिती वाटते, प्रेशर वाढत आहे.

मी तर आपण ठरलंय त्याप्रमाणे वागत असून त्याप्रमाणे आपण चाललो आहे. तु जर माघारी जाणार असशील तर माझी गाडी घेऊन जा. नको म्हणाला तुम्ही गाडी घेऊन पुढे जा. आज तो मीडियाची दिशाभूल करतोय. स्वतःवर किती अन्याय झालाय, जो ग्रुप गेला त्याने त्याला गनपॉईंटवर नेला, प्रेशर केलं, टॉर्चर केलं, कुणीतरी धरलं, असेल काहीही झालेले नाही.

हा मीडिया, पक्ष प्रमुखांची दिशाभूल करत आहे. तुमच्यामुळे मी निवडून आलो आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे आहे. ज्यांने पक्षप्रमुखांची अडीच वर्षे दिशाभूल केली, त्याने माझी दिशाभूल केली. या माध्यमातून वर्षावर जाऊन बसतो आणि मिडियाला अन्याय झाल्याचे सांगत आहे. असलं काहीही घडलेले नाही. कोणाला कुठलाही दबाव नसून भाईंनी कोणालाही फोन केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT