Congress and Thackeray Sena leaders during a key meeting on Kolhapur municipal election seat sharing amid MVA alliance discussions. Sarkarnama
मुंबई

Kalyan Dombivli Mayor Election : महापौर निवडीआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! दोन नगरसेवक मनसेत तर दोन नॉट रिचेबल...

Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी 62 हा बहुमताचा आकडा आहे. मात्र, निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आलेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक आहेत. त्यामुळे आता ठाकरेंचे नगरसेवक आपल्याकडे आणण्यासाठी भाजप शिवसेनेकडून डावपेच आखले जात आहेत.

Jagdish Patil

KDMC Mayor Election Update : महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापालिकांमध्ये महापौर कोणाचा? यासाठी चढाओढ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. खासकरून कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर पदासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

कारण या ठिकाणी कोणत्याच पक्षाकडे पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे त्यांना इतर पक्षातील नगरसेवकांची गरज भासणार आहे. यासाठी सध्या या महापालिकेतील नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाल्याचं दिसत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी 62 हा बहुमताचा आकडा आहे.

मात्र, निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे 53 तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आलेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक आहेत. त्यामुळे आता ठाकरेंचे नगरसेवक आपल्याकडे आणण्यासाठी भाजप शिवसेनेकडून डावपेच आखले जात आहेत.

अशातच मंगळवारी कोकण भवनात गटाची नोंदणी करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे केवळ 7 नगरसेवक उपस्थित होते. बाकीच्या चार नगरसेवकांपैकी दोन बेपत्ता असून ते शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक मनसेत गेल्यामुळे सध्या कल्याण डोंबिवलीत अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळत आहेत.

दरम्यान ठाकरे गटाच्या गटनेता निवडीच्या बैठकीला दोन नगरसेवकांनी दांडी मारली होती. हे दोन्ही नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचं समजताच ठाकरेंच्या शिवसेनेकडून या दोन नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत पत्र देण्यात आलं आहे. तर ठाकरेंचे दोन स्वप्नील केणे आणि राहुल कोट हे दोन नगरसेवक मनसेत दाखल झालेत.

महत्त्वाचं म्हणजे ते दोघेही मूळचे मनसेचेच होते. त्यामुळे आता मनसेच्या नगरसेवकांची संख्या 5 वरुन 7 इतकी झाली आहे. तर फोडाफोडीच्या भितीमुळे ठाकरेसेनेने 7 आणि मनसेने 2 नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवलं आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे.

या दोघांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतली होती. शिंदेंनी तिकीट नाकारल्यानंतर मधुर म्हात्रे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढले आण विजयी झाले. मात्र, निकाल लागल्यानंतर म्हात्रेंनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. अशातच आता हे दोन्ही नगरसेवक गायब झाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT