Kalyan News Sarkarnama
मुंबई

Kalyan News: हक्काच्या मतांसाठी आमदाराचे रेल्वेमंत्र्यांना साकडे; रेल्वेच्या जमिनीवरील घरे वाचविण्यासाठी...

MLA Ganpat Gaikwad News:नागरिकांमध्ये संभ्रम

Bhagyashree Pradhan

Dombivli: लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यानंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत. कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड देखील आपली हक्काची मते वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रेल्वेच्या जमिनीवर असणारी घरे रेल्वे प्रशासन तोडणार असल्याच्या नोटीसा संबधीत घरमालकांनी देण्यात आल्या आहेत. मात्र ही घरे तोडू नये, अशी विनंती आमदार गणपत गायकवाड यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्राद्वारे केली आहे.

पाणी बिल,मालमत्ता कर नियमित भरतात...

कल्याण पुर्वेतील वालधुनी, आनंदवाडी तसेच अशोकनगर व लगतच्या परिसरातील रेल्वेच्या जागेवर हजारो नागरीक गेल्या ३५ ते ४० वर्षांपासुन किंबहुना त्याहून अधिक काळापासून घरे बांधुन राहत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेस नियमित मालमत्ता कर व पाणी बिल तसेच वीज बिले भरत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...

कल्याण पुर्वेतील वालधुनी, आनंदवाडी तसेच अशोकनगर व लगतच्या परिसरात घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जोर जबरजस्तीने पोलिस बळाचा वापर करून नागरीकांच्या घरांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

सर्व कागदपत्र जमा तरीही रेल्वेच्या नोटीस...

आपल्या जवळ असलेली सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा केलेली असतांना देखील कागदपत्रे जमा केलेली नसल्याबाबतच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत, तर अनेकांना वरिष्ठ समाज विकास अधिकारी, सामजिक विकास कक्ष एम.एम.आर.डी.ए. मार्फत नोटीसा देण्यात आलेल्या आहेत तर अनेकांना मा.संपदा अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्याकडून नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

पुनर्वसन धोरण ठरवावे...

या सर्व नागरीकांचे पुनर्वसन करण्याबाबतचे धोरण ठरवून त्यांचे पुनर्वसन होईपर्यत त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश संबंधीतांना प्राधान्याने देण्यात यावेत तसेच त्यांचंया पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात यावी अशी विनंती गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.

असे असले तरी या सर्व भागातील मतदार हे आमदार गणपत गायकवाड यांच्या विधानसभा परिक्षेत्रातील आहेत. त्यामुळे गायकवाड यांनी पात्र लिहिले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र गणपत गायकवाड सर्वांसाठी कायमच मदत करतात त्याच हेतूने हे पत्र त्यांनी लिहिले आहे, अशी माहिती कार्यकर्ते मतदार क्षेत्रातील नागरिकांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT