Mumbai Political News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. त्यादृष्टीने प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणीसाठी ठोस पाऊले उचललेली दिसत आहेत. त्यानुसार काही पक्षांनी मोठे निर्णय घेणे सुरू केले आहेत.
शिवसेना शिंदे गटाने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील शहर कार्यकारिणी बरखास्त केली आहे. आता लवरकच नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांनी पक्षबांधणीसाठी विशेष लक्ष घातले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील शहर कार्यकारिणी आणि महिला आघाडीच्या कार्यकारणीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या आदेशाने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे. आता गुरूवारी अंबरनाथ तर शुक्रवारी उल्हासनगर शहरातील नव्या नेमणुकांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यावेळी खासदार शिंदे उपस्थित असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा दणदणीत विजय झाला. त्यांच्या या विजयामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे चित्र होते. लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजतील. त्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली पक्षीय ताकद आणखी वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेच्या वतीने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरातील शहर कार्यकारिणी आणि महिला आघाडीची कार्यकारिणी बरखास्त केली आहे.
जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या आदेशानही दोन्ही शहरातील ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. आता दोन्ही शहरांमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कार्यकारिणीची पुनर्बांधणी केली जाणार आहे.
त्यासाठी गुरूवार, 18 जुलैला अंबरनाथ येथील पूर्वेतील पनवेलकर सभागृहात तर 19 जुलैला उल्हासनगरच्या कॅम्प एक येथील गुरूद्वारा सभागृहात मुलाखतींचे आयोजन सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे. यावेळी खासदार शिंदेंसह शिवसेनचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेंनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.