Maharashtra Political News : महाविकास आघाडीशी जुळले नाही म्हणून लोकसभा निवडणुकीत वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी वेगळी चूल मांडली. वेगळी भूमिका घेऊनही त्यांनी कोल्हापुरात शाहू छत्रपती आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून उमेदवार दिला नाही. महाविकास आघाडीने मात्र अकोल्यात उमेदवार दिला. संबंधित उमेदवार संघ विचाराचा असल्याचा आरोप करत समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी शरद पवारांना अकोल्यातील उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले आहे. Kapil Patil Letter to Sharad Pawar Over MVA contest in Akola against Prakash Ambedkar.
कपिल पाटलांनी पत्राद्वारे शरद पवारांना Sharad Pawar लोकसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तसेच अकोल्यातील उमेदवारीबाबत भाष्य केले आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सातत्याने प्रखर भूमिका घेणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सामावून घेण्यात अपयश आले. त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे. आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींही वंचितविरोधात प्रचारात उतरले आहेत. हे खरोखरच दुर्मानवी आहे, याकडेही पाटलांनी पवारांचे लक्ष वेधले.
प्रकाश आंबेडकरांनी Prakash Ambedkar शाहू छत्रपती यांना कोल्हापुरात, बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत. अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील संघ - भाजपच्या विचारांचे समर्थक आहेत.
बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिमविरोधी द्वेषाचे ते आजही समर्थन करतात. असे असतानाही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उद्या आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा जाहीर करावा, अशी विनंतीही पाटलांनी Kapil Patil पवारांना केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरे Uddhav Thackeray महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात. त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणे, संसद भवनात फोटोही न लावणे, मंडल आयोग दडपून ठेवणे अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचे पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही, असेही पाटील म्हणाले आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.