MLA Kapil Patil
MLA Kapil Patil Sarkarnama
मुंबई

MLA Kapil Patil : तुम्हाला उमेदवारी देऊन चूक झाल्याची उद्धव ठाकरेंना जाणीव; कपिल पाटलांचा अभ्यंकरांना टोला, काय आहे प्रकरण?

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Teacher Constituency : मुंबई शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकरांनी शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि समाजवादी गणराज्य पार्टीचे नेते आमदार कपिल पाटील यांना नोटीस पाठवली आहे. वाघमारे आणि पाटील यांनी अभ्यंकरांवर आदर्श घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता.

त्यावर आता माफी मागावी अन्यथा 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराही दिला आहे. या नोटीसीनंतर आमदार पाटील यांनी अभ्यंकरांना सडेतोड उत्तर दिले आहे. तुम्हाला उमेदवारी देऊन शिवसेना ठाकरे गटाला पश्चाताप झाला आहे, अशी टीका पाटलांनी केली.

कपिल पाटील Kapil Patil म्हणाले, आपण पाठवलेल्या नोटीसमध्ये आदर्श सोसायटीमध्ये आपले नाव असल्याचे कबुली दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्यात राजीनामा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आदर्श सोसायटीतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची देखील आठवण आमदार कपिल पाटील यांनी नोटीसला दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे.

आपण वयाने ज्येष्ठ आहात. 80 च्या घरात जाताना अपल्याला आमदारकी हवी आहे, ती कशासाठी? असा प्रश्नही पाटलांनी उपस्थित केला. तुम्हाला उमेदवारी देऊन चूक झाली याची जाणीव शिवसेनालाही झाली हेही काही कमी नाही, असा टोलाच पाटील यांनी अभ्यंकर यांना लगावला आहे.

उमेदवारी घेताना आपण ही माहिती आपल्या नेत्यांपासून लपवली असणार. अन्यथा उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray आपल्याला कधीच उमेदवारी दिली नसती, अशी खात्रीही पाटलांनी व्यक्त केली. तसेच शिवसेनेला आता हे लक्षात आल्याने ते योग्य ती दुरुस्ती करतील, अशी आशा आहे, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, कारगील युद्धातील हुतात्म्यांसाठी राखीव असणाऱ्या आदर्श सोसायटीत खोटी कागदपत्रे आणि कमी वेतन दाखवून फ्लॅट लाटणाऱ्या जे. एम. अभ्यंकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केला होता. शिक्षण संचालकपदावर असताना शिक्षकविरोधी निर्णय घेऊन समस्त शिक्षकांचे खच्चीकरण करणाऱ्या अभ्यंकर यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असे वाघमारे यांनी म्हटले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT