Devendra Fadanvis, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Karnataka Maharashtra Border Dispute : कर्नाटक दौरा रद्द ; फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले..

Karnataka Maharashtra Border Dispute : हा दौरा रद्द करण्यामागचे खरे कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामा ब्युरो

karnataka Maharashtra Border Dispute : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी राज्यातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही मंत्री 6 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार होते. त्याआधीच कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं होत. 'या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये,' असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले होते.

"सीमावाद चिघळू नये, म्हणून शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा दौरा तूर्त रद्द करण्यात आला आहे. या विषयांवर सरकार भूमिका घेत नसल्याचा आरोप करुन विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विधानानंतर शिंदे सरकारनं हा दौरा रद्द केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहेत. हा दौरा रद्द करण्यामागचे खरे कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस ," महाराष्ट्रातील मंत्री महापरिनिर्वाण दिनानिमित्त कर्नाटकात जाणार होते. या दोन्ही राज्यांमध्ये सध्या सीमावाद आहे. अशावेळी तेथील संभाव्य वाद टाळावा याकरीता दौरा रद्द होऊ शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील,"

"मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही. पण महापरिनिर्वाण दिनी अशा प्रकारचा वाद निर्माण करायचा का म्हणून यासंदर्भात विचार करतो आहोत. प्राथमिक मत असं आहे की महापरिनिर्वाण दिनी आंदोलन व्हावं, चुकीची घटना व्हावी, असं होऊ नये. अशा घटना टाळण्यासाठी दौऱ्याबाबत विचार सुरू आहे," असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

"सर्वोच्च न्यायालयात सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचे प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत महाराष्ट्र किंवा कर्नाटक निर्णय घेऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालायच याबाबत निर्णय घेईल. त्यामुळे विनाकारण नव्याने वाद तयार करणे योग्य नाही. महाराष्ट्राने अतिशय ताकदीने बाजू मांडली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेलच. मंत्र्यांचा दौरा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होता," असे फडणवीस म्हणाले.

सीमाप्रश्‍नी राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेले समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई 6 डिसेंबर रोजी बेळगाव दौर्‍यावर रवाना होणार होते. सध्या दोन्ही राज्यातील परिस्थिती लक्षात घेता शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावला येऊ नये, अशी विनंती कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी एका संदेशाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT