Dhananjay Munde
Dhananjay Munde  Sarkarnama
मुंबई

Dhananjay Munde : शाहांच्या बैठकीत बोम्मई बोलतात, शिंदे गप्प का राहतात ? ; मुंडेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो

Karnataka Maharashtra border dispute : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादावरुन (Karnataka Maharashtra border dispute) घमासान सुरु आहे. महाराष्ट्रातील वाहने सीमा भागात अडवण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले. कर्नाटकचे महाराष्ट्राला डिवचणे सुरुच आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करुन सीमा भागातील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नसल्याचे नुकतेच बजावले आहे.

आज हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, पण अद्याप सीमावादावर शिंदे-फडणवीस सरकाराने ठराव केलेला नाही. यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांनी राज्य सरकारवर टीका केली. मुंडे पत्रकारांशी बोलत होते.

धनंजय मुंडे म्हणाले, " राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे काल सरकारने निलंबन केले, हा दिवस काळा दिवस होता. महाराष्ट्र हा खणखर आहे. तो कधीही दिल्ली समोर झुकणार नाही. दिल्लीतील भाजपचे नेते जे सांगतील तसे हे सरकार वागत आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कुणीही काही बोलायचं नाही, असे सांगितले तरी देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात, मात्र आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीही बोलत नाहीत,"

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमावादा बाबतचा हा प्रकार थांबवा, अन्यथा मला तेथे यावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमाची भूमिका घेतली. शरद पवार यांना तेथे जाण्याची वेळच येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही सरकार अजूनही भूमिका घेत नाही, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

आज दोन्ही सभागृहातील कामकाजात विरोधक सहभागी होणार नाहीत.विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. सीमाप्रश्नावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. चार दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. यातच जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करणार आहे. याचे पडसाद विधानभवनात देखील उमटत आहे. विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन सुरु केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT