Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest News Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राऊतांचं मोठं विधान ; म्हणाले , शिवसेनेने हि जागा ..

सरकारनामा ब्युरो

Kasba-Chinchwad News : पुण्यातील कसबा (Kasba Peth Assembly Constituency) आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (Chinchwad Assembly Constituency) पोटनिवडणूक (Maharashtra By-Election 2023) 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे.

भाजप या दोन्ही मतदार संघातून कुणाला उमेदवारी याचा निर्णय आज सांयकाळपर्यंत होणार आहे. तर या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी सांगितले.

तर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे. चिंचवड विधानसभा ठाकरे गट लढण्याच्या तयारीत असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. तर कसबा पोटनिवडणुक ही महाविकास आघाडी लढणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.

अंधेरी पोटनिवडणुकीत ज्याप्रमाणे महाराष्ट्राची परंपरा जपली त्याप्रमाणे कसबा आणि पिंपरीमध्ये महाविकास आघाडीने संस्कृती जपावी, असा सूर भाजपाकडून लावला जातोय. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवार उभा करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असताना संजय राऊतांनी सूचक विधान केलं आहे.

मृत आमदाराच्या जागेवर जर त्यांच्या कुटुंबीयातील उमेदवार पोटनिवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली नाही. तिथे निवडणूक झाली. भाजपा निवडणूक लढला नाही. याठिकाणी भाजपाला जिंकण्याची संधी नव्हती, म्हणून त्यांनी उमेदवारी मागे घेतली, असं संजय राऊत म्हणाले.

काल रात्री (मंगळवार) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे मातोश्रीवर आले होते. यासंदर्भात काय पावलं टाकायची, कोणता निर्णय घ्यायचा यावर चर्चा झाली आहे. उद्या-परवा पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. निवडणूक लढली तर चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी असं मत आहे. कसब्याबाबत राष्ट्रवादी-काँग्रस यांच्यात चर्चा होईल, अशा प्रकारचीही चर्चा झाली, यावर निर्णय होईल, असं राऊत म्हणाले.

SCROLL FOR NEXT