Kedar Shinde News
Kedar Shinde News Sarkarnama
मुंबई

दिघेंचा शिष्य गुवाहाटीत तर पुतण्याने जोडले समाधीला हात

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : आज ज्या परिस्थितीतून शिवसेना (Shivsena) जात आहे ते पाहता सामान्य शिवसैनिकाला प्रचंड यातना होत आहेत. शिवसेना एकसंध राहिली पाहिजे, दिघे साहेबांना देखील असे प्रकार अपेक्षित नसते. या कठीण काळात शिवसेना पक्ष पुन्हा एकजुटीने मजबुतीने उभा रहावा, अशी प्रार्थना स्व. आनंद दिघे (Anand Dhighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dhighe) यांनी शक्तीस्थळावर जाऊन केली.

सामान्य शिवसैनिक आजही शिवसेना पक्षाशी प्रामाणिक आहे. निष्ठावंत शिवसैनिक कधीही पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जात नाही. पक्षाचे हित कशात आहे हे नेतृत्वाला माहित असते, त्यामुळे पक्षाने कोणती भूमिका पक्ष हितासाठी घ्यायला हवी हे पक्ष नेतृत्व त्या - त्या वेळी ठरवत असते. पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसैनिक काम करतो. त्यामुळे आज जी काही भूमिका काही लोकांकडून घेतली गेली आहे आणि त्यामुळे जी स्थिती शिवसेनेत निर्माण झाली आहे ती दुर्दैवी असल्याचे केदार यांनी म्हटले आहे.

या कठीण काळात शिवसेनेतील वातावरण पुन्हा पूर्ववत व्हावे व एक कुटुंब असणारी शिवसेना पुन्हा मूळ स्वरूपात ताकदीने उभी रहावी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेनेची वाटचाल यापुढेही सुरू रहावी यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळी शक्ती स्थळ येथे जाऊन केदार यांनी प्रार्थना केली. दिघे साहेबांनी सामान्य शिवसैनिकाला बळ द्यावे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. दिघे साहेब या संकट काळातून शिवसेनेला नक्की बाहेर काढतील, जे वादळ आले ते शमेल,असा विश्वास केदार यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT