eknath khadase waits for uddhav message
eknath khadase waits for uddhav message 
मुंबई

उद्धव ठाकरेंच्या निरोपाची वाट पाहण्याची आता खडसेंवर वेळ

तुषार रुपनवर

मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली असून अद्याप त्यांना कोणताच निरोप आलेला नाही.  खडसे हे मुख्यमंत्र्यांच्या निरोपाची वाट पाहत आहेत. त्यामुळे आज एकनाथ खडसेंना मुख्यमंत्री वेळ देतात कि नाही ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नाराज एकनाथ खडसेंची समजूत काढण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या असून दिल्लीतील नेते भूपेंद्र यादव आणि राज्यातून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. खडसेंनी काल दिल्लीत शरद पवार यांच्या भेट घेतल्यानंतर अखेर भाजप पक्ष नेतृत्वाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली.

खडसेंना पक्ष सोडण्यापासून रोखण्यासाठी या दोन नेत्यांना प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खडसेंच्या नाराजीमुळे ओबीसी - बहुजन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने हे पाऊल उचलण्यात आले.

भाजपमधून बाहेर पडण्याचे संकेत व इशारे देणारे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिल्लीवारी करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. मात्र त्यांना भाजपाध्यक्ष तर सोडाच; पण कार्यकारी अध्यक्षांचीही वेळ सोमवारी  मिळालेली नव्हती. ""आपल्याला पक्षातून दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. मी "यांची' आरती करावी काय?'' असे विचारणारे खडसे यांना भाजपच्या दृष्टीने बोलायचे तर रिकाम्या हातानेच माघारी परतले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT