Cm Eknath Shinde|
Cm Eknath Shinde| 
मुंबई

खोतकर म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी रोज पाच तास झोपायला हवे...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसल्यापासून एकनाथ शिंदे चौदा-पंधरा तास बैठका, गाठीभेटी आणि कार्यक्रमांमध्येच झोकून दिलं आहे. या धावपळीत मुख्यमंत्री शिंदे यांनी रोज रात्री पाच तास तरी झोपायला हवे, असा ठराव करण्याची सूचना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे. त्याचवेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेटायलाही तयार नसायाचे असा चिमटाही खोतकरांनी ठाकरेंना काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्या कामाचे तास आणि त्यावरुन राजकारण पाहता खोतकरांचा सल्लाही राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे.

''पण त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मात्र तोंडभरुन कौतुक केलं आहे. ''आता शिंदे साहेबांना भेटण्यासाठी सर्व दरवाजे खुले आहे, इथे कधीही जा, नक्की भेट होणार. असंही त्यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर मुख्यंत्री शिंदे १४ ते १५ तासांपेक्षा अधिक काम करत आहेत. कामामूळे त्यांची झोपही होत नाही. त्यामुळे नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही चिंता व्यक्त केली, मुख्यमंत्र्यांनी कमीत कमी पाच तास तरी झोपावे, यासाठी शिंदे गटाकडून ठराव मांडण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेती आमदार, नेत्यांसाठी त्यांना वेळ नव्हता. आमदार तासन् तास त्यांच्या घराबाहेर थांबून निघून जात होते. अशी तक्रार शिंदे गटाच्या आमदारांकडून होत असते. शिवसेना सोडण्याचे हे देखील एक कारण शिंदे गटाच्या आमदारांकडून सांगण्यात येत असते. दरम्यान, गेल्या महिन्यातच सततचे दौरे, सभा, कार्यक्रम यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडली होती. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.

तर मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या तासांवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील त्यांच्यावर निशाणा साधला होता. ''राज्यात शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना राज्य सरकारला मात्र शेतकऱ्यांच्या समस्यांशी काही घेणं देणं नाही. आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. पण जेव्हा पाहावं तेव्हा मुख्यमंत्री म्हणत असतात की, मी सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो, ते ६ वाजेपर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी?' असा सवालही अजित पवारांनी त्यावेळी उपस्थित केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT