Kirit Somaiya News, Anil Parab News, latest political News
Kirit Somaiya News, Anil Parab News, latest political News sarkarnama
मुंबई

सोमय्यांनी दिले रिसॉर्टचे पुरावे ; त्यांच्या बारा मुद्यांचे उत्तर परब देतील का ?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री शिवसेनेचे (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीने काल सकाळी छापेमारी केली. अनिल परब यांच्या संबंधित अशा एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाडसत्र सुरू केले होते. तब्बल १३ तासानंतर ईडीचे (ED) अधिकारी परब यांच्या घरातून बाहेर पडले. त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. ईडीच्या कारवाईनंतर परबांनी त्या रिसॉर्टशी आपला संबंध नसल्याचा दावा केला. (Anil Parab latest Marathi news)

अनिल परब यांच्या दाव्यानंतर भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत त्यांचा दावा खोडून काढला आहे. सोमय्यांनी यावर १२ मुद्दे काढले आहेत, त्याचे उत्तर परब देणार का,असा सवाल सोमय्यांनी केला आहे. दापोलीतील रिसॉर्टबाबतच्या काही पावत्या सोमय्यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्या.

किरीट सोमय्या म्हणाले, "'माझा त्या रिसॉर्टशी काही संबंध नाही. तो रिसॉर्ट सदानंद कदमचा आहे. अनिल परब साहेब, माझ्याकडे १७ डिसेंबर २०२० ची एक पावती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अनिल पर्यावरण मंत्री. अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री. त्याच रत्नागिरीतील दापोलीत असलेल्या मुरूड गावात ग्रामपंचायतीची पावती आहे," मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर टीका केली.

"अनिल परब यांनी २०२०-२१ मध्ये रिसॉर्टचा मालमत्ता कर भरला. त्याची पावती आहे. तो मी नव्हेच, नाट्यकार अनिल परबांनी यांचं उत्तर द्यावं. दुसरी पावती आहे, ती नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मधील. २०१९-२० मध्येही या रिसॉर्टचा मालमत्ता कर, दिवाबत्ती कर अनिल परब यांनी भरला आहे. हा रिसॉर्ट सदानंद परबचा आहे, तर अनिल परब घरपट्टी तुम्ही का भरत होतात?, असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला.'फसवणूक, चोरी, लबाडी, डाकूगिरी, माफियागिरी यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना नोबेल पुरस्कार मिळेल. उद्धव ठाकरेंनी बंगल्याबद्दल नाटकं केलं, असा आरोप सोमय्यांनी केली आहे.

'त्या' भूमिकेसाठी अनिल परबांना पसंती..

'अनिल परब यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला त्या नाटकाची आठवण झाली आणि त्या नाटकाचं नाव आहे तो मी नव्हेच. तो मी नव्हेच मधील भूमिकेबद्दल माधव पळशीकरांना अनेक बक्षीसं मिळाली होती. परत ते नाटक करायचं झालं, तर त्या भूमिकेसाठी अनिल परबांना पसंती असेल, असे सोमय्या म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT