Kirit Somaiya|
Kirit Somaiya| 
मुंबई

'माझाही मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न': सोमय्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

मुंबई : खार पोलीस स्टेशमध्ये जो हल्ला झाला तो ठाकरे सरकारने स्पॉन्सर केला होता. मी खार पोलीस स्टेशनला जाणार आहे हे मी आधीच पोलिसांना कळवल होतं, पोलिस स्टेशनमधून ४० मिनिट चर्चा केल्यानंतर बाहेर पडल्यानंतर खार पोलस स्टेशनच्या आवारात माझ्यावर ७०-८० गुंडांनी हल्ला केला. माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ठाकरे सरकारने किरीट सोमय्यांचा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.

कालच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेतून ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. मी राणा दाम्पत्यांना भेटायला गेलो होतो पण पोलीस स्टेशनच्या आवारात दारात शिवसैनिक थांबले होते. मला पाहताच त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. मी बाहेर पडून गाडीत बसताच माझ्या गाडीवर चप्पलफेक, दगडफेक केली. हल्ल्याची तक्रार द्यायला गेलो तर संजय पांडेनी आधीच माझ्या नावे चुकीची एफआयआर दाखल करुन ठेवली होती. मी सही करायला विरोध केला तर पोलिसांनी मला धमकी दिली. ठाकरे सरकारप्रमाणेच आयुक्त संजय पांडे हेदेखील माझ्यावरील हल्ल्याला जबाबदार आहेत, असाही आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

या प्रकरणी उद्या भाजपचे एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिव अजयकुमार यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे. या प्रकरणीत त्यांना लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचेही किरीट सोमय्यांनी सांगितले. तसेच, राणा दाम्पत्य अपक्ष उमेदवार असताना आपण त्यांना भेटायला का गेले असे विचारले असता, किरीट सोमय्या म्हणाले की, जर एखाद्या लोक प्रतिनीधीने मदत मागितली तर त्याला भेटायला जाणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो. पण खार पोलीस स्टेशनच्या बाहेर ८० गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, ते तिथे जमा झालेच कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे सरकाची माफिया गिरी पहिल्याच दिवशी दिसली. हे उद्धट ठाकरे सरकार आहे. पण भाजप ठाकरे सरकारचे सर्व घोटाळे बाहेर काढणार, ठाकरे सरकार हे माफिया सरकार आहे. भाजप नेते केंद्रीय गृहसचिवालयाशी बोलत आहेत. लवकरच उद्धव ठाकरे सरकारे आम्ही घोटाळे बाहेर काढू, आणि ज्या पोलिसांनी माझ्यावर हल्ल्याची चूकीची एफआयआर दाखल केली, त्यांनी तात्काळ निलंबित करण्याची मागणीही आम्ही केंद्रीय गृहसचिवालयाकडे केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT