Hasan Mushrif, Kirit Somaiya
Hasan Mushrif, Kirit Somaiya  Sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya : हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची छापेमारी; भाजप नेते किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Kirit Somaiya On Hasan Mushrif Ed Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरावर बुधवारी(दि.११) सकाळी ईडीची छापेमारी सुरु आहे. आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना प्रकऱणी ईडीकडून ही कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. आधी माजी मंत्री अनिल देशमुख नंतर नवाब मलिक आणि आता हसन मुश्रीफ यांच्या रुपानं राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर भाष्य केलं आहे. सोमय्या म्हणाले,हसन मुश्रीफांच्या विरोधात 158 कोटी रूपयांचे पुरावे आम्ही दिले होते. पण उद्धव ठाकरेंच्या सरकारने हे प्रकरण दाबलं होतं. परंतू, शेवटी महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळाला. आणि उध्दव ठाकरे यांची तर एवढी मेहेरबानी होती की, फक्त घोटाळे करणं एवढंच ठाकरे सरकारचं काम होतं.

हसन मुश्रीफ यांनी तर आपल्या जावयाच्या कंपनीला १५०० रुपये कोटींची कामं दिली होती. त्याचीही चौकशी सुरु झाली आहे. आता सगळे घोटाळे बाहेर येणार असून आता काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी तयार राहावं असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी हसन मुश्रीफ यांनी आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ईडी कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

ईडीने ही कारवाई केल्यानं राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, मुश्रीफ यांच्या कारवाईवर राष्ट्रवादीच्या काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीकडूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तसेच कागल येथील घराबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करतानाच आंदोलनाचा इशाराही दिला आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे.पोलिसांकडून कार्यकर्त्यांना मुश्रीफांच्या घराकडे जाण्यापासून रोखलं आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाई दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईत ईडीचे जवळपास २० अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले. याचवेळी पुण्यातील घरावर देखील छापेमारी सुरु आहे.

सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याचप्रकरणात ही कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे आहेत किरीट सोमय्यांचे आरोप ?

भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकावरर परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला होता. सोमय्या म्हणाले, मुश्रीफ यांनी आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला आहे. या घोटाळ्यासंबंधीची कागदपत्रं सोमय्या यांनी ईडीकडे देणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच २०२० कोणतेही व्यवहार न होता हा कारखाना ब्रिक्स इंडियाला देण्यात आला. कोणताही अनुभव नसताना हा कारखाना त्या कंपनीला चालवायला देण्याचं कारण म्हणजे मुश्रीफ यांचे जावई या कंपनीत असल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT