Kirit Somaiya, Pratap Sarnaik
Kirit Somaiya, Pratap Sarnaik Sarkarnama
मुंबई

मी गुरूवारपर्यंत वाट पाहणार! अन्यथा : किरीट सोमय्या यांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून कागदपत्रे तपासल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांना ठाकरे सरकारने नोटीस पाठवली होती. त्यावरुन चांगलेच राजकारण तापले होते. यावरुन आता किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीच शिवसेनेचे आमदार प्रतास सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

या संदर्भात सोमय्या यांनी ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, प्रताप सरनाईक आणि सहकाऱ्यांनी "माहितीअधिकार खाली रेकॉर्डची मी मंत्रालयात पाहणी करीत होतो, त्यावेळी माझे छायाचित्रे काढून सोशल मीडियावर प्रसिद्ध करून माझी सुरक्षा आणि गुप्ततेशी तडजोड केली. मी फाईल पाहत असताना प्रताप सरनाईक आणि त्यांचे कार्यकर्ते माझ्या जवळ आले. त्यांनीच फोटो काढले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. मी गुरुवारपर्यंत वाट पाहणार नाहीतर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला. पोलिसांनी सरनाईक आणि सहायक विरोधात एफआयआर दाखल करावी आणि त्यांची अटक करावी अशी आमची मागणी आहे. असे पत्र सोमय्या यांनी मरीन लाईन पोलिस स्टेशनला आणि नगरविकास विभागाचे जनमाहिती अधिकारी यांनाही पाठवले आहे.

दरम्यान, सोमय्या यांनी याआधिही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत हिम्मत असेल तर एफआयआर दाखल करा, असे आव्हाण दिले होते. त्यानंतर त्यांनी सरनाईक यांनाच अटक करण्याची मागणी केली आहे. सोमय्या म्हणाले होते, फक्त एका फोटोसाठी मुख्यमंत्री माझ्यावर गुन्हा दाखल करायला सांगत आहेत. दोष काय तर मी खुर्चीवर बसलो. दोन कर्मचारी माझ्या सेवेत आहेत. ठाकरे जे खोटे बोलले ती चोरी मी पकडली, त्याचा राग त्या कर्मचाऱ्यांवर ते काढत आहेत. एका गरीब टायपिस्ट लिपीकाला तुम्ही नोटीस देता. बाळासाहेब ठाकरे कुठे आणि हे मुख्यमंत्री बघा.

भ्रष्टाचार तुम्ही करता, लढाई करायची आहे तर माझ्याशी करा, माझ्यावर कारवाई करा, गरीब लिपीकाला नोटीस पाठवताना मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघात सोमय्या यांनी केला होता. ज्या फोटोसाठी मला २ दिवसात कारणे द्या नोटीस पाठवली, तो फोटो माझा आहे. त्यामध्ये एका अधिकारी आणि एक लिपीक दिसतो. फोटो अंतरावरून काढला. तो काही सेल्फी नाही. ज्यांनी फोटो काढला तो अपलोड केला, त्याला नोटीस देण्याऐवजी जे व्हिक्टीम आहेत,'' त्यांना ठाकरे सरकार नोटीस देत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मुख्यमंत्र्यांना तो फोटो कोणी काढला, ते माहीत आहे. त्या टायपिस्टसोबत बदला घेण्याचे पाप मुख्यमंत्र्यांनी केले. हा फोटो कोणी काढला ते तपासून पाहा. तुमच्याकडे मंत्रालय सुरक्षा विभाग आहे. तसेच मला कोणत्या कायद्याच्या आधारे नोटीस पाठवली आहे. कायद्याचे सेक्शन दाखवा. उद्धव ठाकरेंचा कायदा आहे, त्यांची ठोकशाही, माफिया सेनेची दादागिरी आणि गुंडागिरी आहे, असे आरोप सोमय्या यांनी केले होता.

मी १७ जानेवारीला माहिती अधिकाराचा अर्ज केला होता. प्रश्न काय तर खुर्चीवर का बसवले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मी कागदपत्रांची पडताळणी करून आलो. ग्रामविकास मंत्रालय आणि विभागात देखली कागदपत्रांची पडताळणी करून आलो, या सर्व ठिकाणी मला खुर्ची देण्यात आली होती, त्या सर्वांना तुम्ही नोटीस पाठवणार का असेही सोमय्या म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT