Kirit Somaiya news:  Sarkarnama
मुंबई

Kirit Somaiya Viral Video Case: कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Kirit Somaiya Video: विरोधकांचे भ्रष्टाचार, घोटाळे बाहेर काढणारे भाजपचे आक्रमक नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अपडेट समोर आली आहे. सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. "मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी," अशी विनंती किरीट सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काल रात्रीपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओमध्ये किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. एका मराठी वाहिनीने सर्वात आधी हा व्हिडीओ प्रकाशित केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोमय्या यांनी हा व्हिडीओ राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करत सोमय्या यांनी या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली.

काय म्हटलं आहे किरीट सोमय्यांनी या पत्रात?

" सोमवारी सायंकाळपासून एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.

अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे . मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत.

तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार ... झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे.

दुसरीकडे, विरोधी पक्षही आक्रमक झाले आहे. सोमय्या यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत सोमय्यांवर निशाणा साधत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

"बेछूट खोटे - नाटे आरोप करून अनेकांची सार्वजनिक प्रतिमा मलीन करणाऱ्या, सर्वांवर शिंतोडे उडवणाऱ्या भाजपा नेते #किरीट_सोमय्या स्वतः चिखलात लोळून माखलेले आहेत. त्यांच्या विकृत प्रवृत्तीचा भांडाफोड 'लोकशाही मराठी' या वृत्तवाहिनीने आज देशासमोर केला आहे. नैतिकतेच्या खोट्या गप्पा मारणाऱ्या सोमय्यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ किळसवाणा प्रकार आहे. दुसऱ्यांचे चारित्र्य हनन करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपाने सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करावी व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आता धाडस दाखवावे. हिशेब तर द्यावाच लागेल.... या प्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की भाजपाचे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' चा नारा म्हणजेच 'बेटियों को भाजपा से बचाओ' असा नारा आहे. अतिशय लज्जास्पद बाब..!" असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT