kirit somyaa sarkarnama
मुंबई

Kirit Sommya : दिवाळीनंतर किरीट सोमय्यांचे फटाके, मुंबई पालिकेत १८ हजार कोटींचा क्रेडिट नोट घोटाळ्याचे आरोप

Sachin Waghmare

Kirit Sommya : मुंबई महापालिकेतील तत्कालीन पदधिकाऱ्यांनी मोठा भ्रष्टचार केला आहे. या मधील एक प्रकरण उघड करीत दिवाळीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगेचच फटाके फोडले. येत्या काळात आणखी काही भ्रष्टचाराच्या प्रकरणाची पोलखोल करणार असल्याचे सांगत ठाकरे गटाला चांगलेच कोंडीत पकडले. ३५ हजार घरांचे कॉन्ट्रॅक्ट देताना मुंबई पालिकेने १८ हजार ६७५ कोटी रुपयांची क्रेडिट नोट देत भ्रष्टचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

मार्च २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी घरे देताना प्रसिद्ध बिल्डर अतुल चोरडिया, जयंत शहा, शाहिद बलवा या तिघांना मिळून ३५ हजार घरांचे बांधकाम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा निर्णय घेतला होता. या साठी चार वर्क ऑर्डर दिल्या होत्या. यासाठी मुंबई पलिकेकडे येणाऱ्या महसुलातून पैसा खर्च न करता अभिनव पद्धतीने क्रेडिट नोट काढण्याचा निर्णय घेतला होता. या बिल्डरच्या कामांचे पेमेंट या क्रेडिट नोटच्या माध्यमातून करण्यात आले होते. या तिघांना मुंबई पालिकेत १८ हजार ६७५ कोटी रुपयांची क्रेडिट नोट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यांच्यासोबत ३५ हजार घरांचा करार केला. त्यापैकी दहा हजार घरे बांधण्याचे काम सुरु करण्यात आले. त्यापोटी ४१५ कोटी रुपयांची पहिला हफ्ता क्रेडिट नोटच्या माध्यमातून देण्यात आला.

हा क्रेडिट नोटचा प्रकार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आयुक्त इकबाल चहल यांनी अमलात आणला. आजपर्यत मी कधीच ट्रान्स्परट क्रेडिट नोट असे नावच ऐकले नाही. मुंबई महापालिकेच्या या क्रेडिट नोट बाजारात दहा टक्के डिस्कॉउंटनी विकल्या जात आहेत. मुंबई पालिकेने १८ हजार ६७५ कोटी रुपयांचे कर्ज मुंबईकरावर लादले आहे. त्यासोबतच या क्रेडिट नोटच्या माध्यमातून पालिकेकडून पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहेत.

वीस हजार कोटींचा दुसरा घोटाळा उघड करणार

महापालिकेकडून क्रेडिट नोटच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. हा पहिला घोटाळा मी उघड केला आहे. वीस हजार कोटी रुपयांचा दुसरा घोटाळा लवकरच पत्रकार परिषद घेऊन उघड करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT