Kishori pednekar  
मुंबई

शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही म्हणणाऱ्या भाजपला किशोरी पेडणेकरांचे उत्तर

इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही म्हणता, मग भाजप तरी अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांची तरी राहिला आहे का? असा सवाल करत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pedanekar) यांनी भाजपवर (bjp) निशाणा साधला आहे. भाजपनेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

'तुम्ही विषय काढलाच आहे, तर आज फरक दाखवते. अहमदाबादला मी सायन्स सिटीला आम्ही भेट दिली. गुजरात आणि मुंबईत समन्वय असणारे राणी बागेचे डायरेक्टर देखील सोबत होते. मुक्या पक्षी प्राण्यांवर राजकारण करून मुंबईला अस्थिर करण आम्हाला मान्य नाही. मोदी साहेबांनी गुजरातमध्ये जे चांगलं केलं ते मुंबईप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. आमचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला दिशा दिली, १९९३ मध्ये सेना भाजप बरोबर नाही, तर भाजप सेनेबरोबर होती. इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नका,' अशा शब्दांत किशोरी पेडणेकरांनी भाजपला फटकारले आहे.

गुजरातचे लोक महाराष्ट्रात राहून मुंबईकर म्हणतात स्वत:ला, पण मुंबईला बदनाम करतात. त्यांनी चांगले केलंय.पण त्यापेक्षा अधिक चांगले मुंबईत आहे. सुरूवातीला ५० व नंतर प्रत्येक विभागासाठी २०० रूपये फी ठेवलीय. पण आम्ही पूर्ण कुटुंबाला १०० रूपयांत सर्व बघायला देतो. तिथल्या तिकीटावरून वाद होत नाही. आपल्याकडे ज्यैष्ठ नागरिक, दिव्यांगाना फ्री आहे. परंतु तिथं नाही.

'२६४ कोटी खर्च करून तिथं मत्स्यालय उभं करून तिथं त्यांनी पेंग्विन ठेवले. तिथे त्यांनी ६ पेंग्विन आणलेले पण आता फक्त ५ पेंग्विन आहेत. मग त्यांच्याकडील एक पेंग्विन कुठे गेले, पण इथे मात्र एक पेंग्विन संसर्गामुळे मृत्यू पावल्यावर किती गहजब केला.तिकडे अजूनही पेंग्विन सांभाळणारे अनुभवी डॉक्टर नाहीत. तिथं कुठलाही पेंग्विनवरून वाद नाही. मग इथं एवढा वाद का, असा सवाल त्यांनी केला आहे.

जर काही समस्या आली तर ते आमच्या राणीबागेतल्या अधिका-यांकडून मदत मागतात. प्रत्येक गोष्टीला तिथं पैसे घेतात. त्याला माझा आक्षेप नाही. आशिष शेलार, पहिले माफी मागा व मग माझ्याशी समोरासमोर बोला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT