Koregaon MLA Mahesh Shinde have a crore bus; Luxurious convenience 
मुंबई

कोरेगावच्‍या आमदारांच्‍या ताफ्‍यात कोटीची बस; आलिशान सुविधा

त्‍यांनी सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता ९२० कोटींचे असल्‍याचे नमुद केले आहे. त्यांच्या सगळ्या गाड्यांचे नंबर ०००३ असे आहेत. हा लकीनंबर त्यांनी आपल्या नव्या व्हॅनिटी कारलाही घेतला आहे.

उमेश बांबरे

सातारा : कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी कोरोना काळात केलेल्या काम सर्वज्ञात आहे. त्यांनी कोरेगाव मतदारसंघातील तीन हजार लोकांचा जीव वाचविला आहे. आमदार शिंदेंचे कुटुंबच कोरोना काळात रूग्ण सेवेत रमले होते. आता या महेश शिंदेंच्या गाड्यांच्या ताफ्यात तब्बल तीन कोटींची व्हॅनिटी व्हॅन दाखल झाली आहे. सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा या व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कोरेगाव मतदारसंघासह सातारा जिल्ह्यात ही या व्हॅनची चर्चा सुरू आहे. Koregaon MLAs have a crore bus; Luxurious convenience

जिल्‍हा परिषद सदस्य ते आमदारपदापर्यंत महेश शिंदे यांनी मारलेली मजल जिल्‍हा तसेच राज्‍यातील अनेकांच्‍या नेहमी चर्चेचा आणि औत्‍सुक्‍याचा विषय ठरलेला असतो. महेश शिंदे यांच्‍या आलिशान राहणीमानावर शिक्कामोर्तब करणारी तीन कोटी रुपयांची आलिशान बस त्‍यांनी नुकतीच खरेदी केली असून त्‍याचा क्रमांक त्‍यांच्‍यासाठी शुभ असणाऱ्या ०००३ प्रमाणेच आहे.

 नागनाथवाडी येथे इथेनॉल प्रकल्‍प सुरु करणाऱ्या महेश शिंदे यांची पहिल्‍यापासून जिल्‍ह्‍याच्‍या उद्योग क्षेत्रात चर्चा असायची. आमदार शिंदे यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षकी पेशाची आहे. तसेच कोल्हापूर येथील काडसिध्देश्वर महाराजांचे अनुयायी असून त्यांची मुलेही तेथील मठात शिक्षणासाठी आहेत. राष्‍ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्‍या निकटवर्तीय म्‍हणून महेश शिंदे यांचा त्‍याकाळात नेहमी वावर असायचा. नंतरच्‍या काळात ते राष्‍ट्रवादीचे हेवीवेट नेते अजित पवार यांच्‍या कोअर टिममध्‍ये सहभागी झाले.

राज्‍याच्‍या राजकारणावर एकहाती वर्चस्‍व गाजवणाऱ्या पवार कुटुंबियांशी घसट असणारे महेश शिंदे हे नेहमी चर्चेत असायचे. इस्‍त्राईल, ब्राझील येथे शेती, इथेनॉल प्रकल्‍प उभारल्‍याच्‍या चर्चाही नंतर महेश शिंदे यांना चिकटल्‍या. राजकारण व इतर कारणांनी नंतरच्‍या काळात महेश शिंदे हे राष्‍ट्रवादीपासून दुरावले. यानंतर त्‍यांनी भाजपाला जवळ करत माजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी मैत्री केली. कोरेगाव विधानसभा मतदार संघातून भाजपच्‍या तिकिटावर निवडणूक लढविण्‍यासाठीची तयारी त्‍यांनी सुरु केली.

यानुसार पेरणी सुरु असतानाच जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्‍या वाट्याला गेला. यामुळे शिंदे यांनी तांत्रिक मुद्यावर भाजप सोडत शिवसेनेत प्रवेश केला. या निवडणुकीत राष्‍ट्रवादीचे हेवीवेट कार्यकर्ते शशिकांत शिंदे यांना पराभव केला. निवडणूकीत त्‍यांनी सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता ९२० कोटींचे असल्‍याचे नमुद केले आहे. त्यांच्या सगळ्या गाड्यांचे नंबर ०००३ असे आहेत. हा लकीनंबर त्यांनी आपल्या नव्या व्हॅनिटी कारलाही घेतला आहे. या व्हॅनिटी कारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा सध्या कोरेगाव मतदारसंघासह जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यामुळे महेश शिंदे यांची ही व्हॅनिटी कार कशी आहे, याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे.  
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT