मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाचे (ncb) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. वानखेडेंचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे नाव, लग्न आदी विषयांवर मलिकांनी वानखेडेंवर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (kranti redkar) हिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना भावनिक साद घातली आहे. मलिकांच्या प्रश्नांना क्रांतीनं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
''तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्हीं योग्य तो न्याय करा,'' अशी विनंती क्रांतीनं मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात क्रांती रेडकर म्हणते...
माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी एक मराठी मुलगी आहे.. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले.. कुणावर अन्याय करू नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवलं.. तोच घडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे.. लढते आहे.. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघतायत..
मी एक कलाकार आहे.. राजनीती मला कळत नाही.. आणि मला त्यात पडायचं सुद्धा नाही.. आमचा कहिही संबंध नसताना रोज़ सकाळी आमच्या अब्रूची लख्तरं चार चौघात उधळली जातात.. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे..
आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं.. एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणचं किती नीच स्वरूप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्या पर्यंत पोहोचलेलं आहे.. आज ते नाही पण तुम्ही आहात.. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो.. तुम्हीं आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.. तुम्हीं कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याचि मला खात्री आहे.. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय.. तुम्हीं योग्य तो न्याय करा अशी विनंती.
आपली बहिण, क्रांती रेडकर.
कलियुगातील मलिकांनी राज्य धुळीला मिळविलं ; भाजपनं उडविली खिल्ली
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी पत्रकार परिषदा घेत एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर घणाघात करीत त्यांची खिल्ली उडवली आहे. ''मध्ययुगीन भारतात कित्येक नबाब होऊन गेले, त्यातील बहुसंख्य नबाब जनतेची काळजी घेणारे होते. मात्र लोकशाहीतील नबाबाला फक्त आपल्या जावयाची काळजी असल्याचे दिसत आहे,'' अशी टीका लाड यांनी केली. ''मलिक अंबर यांनी आपल्या राजाचे राज्य जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला. तर आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत,'' असा टोमणाही लाड यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.