Mumbai News, 24 Feb : भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, अर्ज भरल्यानंतर अवघ्या 24 तासांतच त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती.
पक्षाच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याचं त्यावेळी कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं होतं. उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका देखील करण्यात आली होती. मात्र आता महापालिका निवडणुकीत पक्षाचा आदेश पाळणाऱ्या महाडिक यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे.
भाजपने कृष्णराज महाडिक वर्णी थेट भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी केली आहे. त्यामुळे भाजपने निष्ठेचं आणि पक्षादेश पाळल्याचं फळ महाडिक यांना दिल्याचं बोललं जात आहे. भाजपने आज (ता.२४) रोजी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अशा विविध पदांचा समावेश आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत या नावांची घोषणा केली. यामध्ये भाजप युवा मोर्चा अध्यक्षपद कृष्णराज महाडिक यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसंच भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, गोपीचंद पडळकर, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील, अर्चना पाटील चाकूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी चित्रा वाघ यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्षपद योगेश टिळेकरांकडे देण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.