Ladki Bahin Yojana Sarkarnama
मुंबई

Ladki Bahin Yojana: Video 'लाडकी बहीण' कोर्टाच्या दारात; योजनेला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

Mumbai High Court Judge Refuses to hear plea on Ladki Bahin Scheme: नवी मुंबईतील एका चार्टर्ड अकाऊंट असलेल्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात शुक्रवारी याचिकेवर झाली सुनावणी झाली.

सरकारनामा ब्यूरो

मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे ही योजना आता कायदेशीर कचाट्यात अडकण्याचे चिन्ह आहे. लाडकी बहीण योजना का ? हा तर करदात्यांच्या पैशांचा अपव्यव आहे, असा दावा याचिकेत केला आहे.

१४ ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणा-या पहिल्या हफ्त्यावर तत्काळ स्थगिती द्या, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

विधासभा निवडणुकीपूर्वी दोन महिने आधी लाडकी बहीण योजना जाहीर केल्याने सरकारी तिजोरीवर मोठा भार पडेल, असा दावा याचिकाकर्त्यानं केला आहे.

नवी मुंबईतील एका चार्टर्ड अकाऊंट असलेल्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या कोर्टात शुक्रवारी याचिकेवर सुनावणी झाली. योजनेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात लागू केली.यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

राज्यातील महिलांना महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. तर या रक्षांबधनाला दोन हफ्त्यांचे पैसे एकत्र मिळणार आहे. मात्र राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना ही योजना लागू केल्याचा आरोप विरोधकांनी केला. वित्त विभागाने देखील यावर प्रश्न उपस्थित केले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केले की, निवडणुकांपुरता हा लाडकी बहिणीचा उमाळा आहे. त्यांनी म्हटले की, दोन महिन्यांमध्ये त्यांच्या खात्यात पैसे टाकतील आणि महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर करतील, मग त्यानंतर पळून जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT