Vidhan Parishad Election 2022  Sarkarnama
मुंबई

विधानपरिषेदची रणधुमाळी : क्रमवारीत पहिला नंबर सेनेच्या अहिरांचा; शेवटी प्रसाद लाड

BJP | Mahavikas Aaghadi | विधान परिषदेच्या आखाड्यात असे होणार मतदान

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी आता अवघे काहीच तास उरले आहेत. त्यामुळे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas aaghadi) या दोन्ही बाजूंनी बैठकांचा जोर वाढला आहे. मत फुटू नये म्हणून सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेल मुक्कामी पाठवले आहे. याशिवाय मत बाद होवू नयेत म्हणून देखील काळजी घेतली जात असून दोन्ही गोटातील आमदारांना मतदानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. (vidhan parishad election news)

दरम्यान यासाठी मतपत्रिका कशी असणार हे देखील समोर आले आहे. या मतपत्रिकेत शिवसेनेचे सचिन अहिर हे पहिल्या क्रमांकावर असणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर दुसऱ्या क्रमांकावर आणि काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे हे तिसऱ्या क्रमांकावर असणार आहेत. चौथ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, पाचव्या क्रमांकावर राम शिंदे, सहाव्या श्रीकांत भारतीय हे असणार आहेत.

मतदार यादीत सातव्या क्रमांकावर पुन्हा शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी, आठव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे, नवव्या क्रमांकावर काँग्रेसचे भाई जगताप, दहाव्या क्रमांकावर भाजपच्या उमा खापरे आणि अकराव्या क्रमांकावर प्रसाद लाड या उमेदवारांचा नंबर असणार आहे. ही सर्व नाव इंग्रजीमध्ये असणार असून यातील प्रत्येक नावापुढे 1, 2, 3 असा आपला पसंती क्रमांक नोंदवायचा आहे. पसंती क्रमांकाशिवाय अन्य कोणतेही लिखाण केल्यास ती मतपत्रिका बाद समजली जाते. म्हणजेत ते मत बाद होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT