Lalbaugcha Raja 2022
Lalbaugcha Raja 2022 sarkarnama
मुंबई

Lalbaugcha Raja : पहिल्याच दिवशी महिला भाविक-सुरक्षारक्षक भिडले, लालबागचा राजाच्या दरबारात धक्काबुक्की

सरकारनामा ब्युरो

मुंबई :मागील दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सव साजरे करता आले नाही. पण यावर्षी मात्र इतर सण आणि गणेशोत्सव (Lalbaugcha Raja 2022) अगदी उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करण्यात येत आहे. आजपासून गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. (Lalbaugcha Raja 2022 news update)

आज लालबागच्या राजाचे दर्शन घेत असताना मंडप परिसरात एक अप्रिय घटना घडली आहे. पोलिसांनी या वादग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती पूर्ववत केली.

लालबागचा राजा म्हणजे अनेकांचं दैवत. लालबागच्या राजाच्या(lalbaugcha raja) दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. मागच्या दोन वर्षांची कसर भरून काढण्यासाठी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असलेली पाहायला मिळत आहे.

यंदा दोन वर्षांनी बाप्पा पुन्हा मंडपात आपल्या भव्य रूपात दाखल झाला आहे. भाविकांनी देखील पहिल्या दिवसापासून दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. चिंचोळ्या गल्लीत बाप्पा विराजमान होत असल्याने आणि त्या तुलनेत भाविकांची मोठी गर्दी असल्याने अनेकदा वाद होतात. आजही दर्शनाच्या पहिल्याच दिवशी एक महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकामध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे.

गणेशोत्सवाचा पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लांब रांगा लागल्या आहेत. अशातच काही महिला दर्शन घेण्यासाठी अधिक काळ थांबायचा प्रयत्न करत होत्या.पण पोलिसांकडून गर्दी पाहता कोणालाच थांबू दिलं जात नाही आहे. या कारणावरुन दर्शनासाठी आलेली महिला आणि महिला सुरक्षारक्षकांमध्ये वाद झालेली आहे. यावेळी महिलेने सुरक्षारक्षक असलेल्या महिलेला धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं. या वादग्रस्त परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवले आहे.

शिवसेनेचे (Shiv Sena) फूट पडून शिंदे सरकार सत्तेत आले. शिवसेना कुणाची? यावर सध्या न्यायालयात वाद सुरु आहे. याचे पडसाद यंदाच्या गणेशोत्सवात उमटत आहे. कल्याणमधील (Kalyan)एका मंडळाने या विषयावर देखावा सादर करण्याचे नियोजन होते. त्यांची तयारीही पूर्ण झाली होती. पण पोलिसांनी आक्षेप घेत देखाव्यावर आज (बुधवारी) पहाटे कारवाई करत देखावा जप्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT