Vijay Wadettiwar News Sarkarnama
मुंबई

Lalit Patil drugs case : 'महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा ड्रगमाफिया ललित पाटीलला आशीर्वाद होता ?'

Vijay Wadettiwar News : ललित पाटील पलायन आणि पकडले जाण्यावरून मोठे राजकीय आरोप होत आहेत.

उत्तम कुटे

Mumbai News : पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळालेला ड्रगमाफिया ललित पाटील याच्या मुसक्या १५ दिवसांनंतर पुणे नाही, तर मुंबई पोलिसांनी चेन्नईतून (तमिळनाडू) आवळल्या. त्यामुळे पुणे (Pune) पोलिसांची दुहेरी नाचक्की झाली. त्यांच्या निष्काळजीमुळे ललित पळाला. तसेच ते त्याला पकडूही शकले नाहीत. दरम्यान, त्याचे पलायन आणि पकडले जाण्यावरून मोठे राजकीय आरोप होत आहेत.

भाजपच्या एका नेत्याचा या पलायनात हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, तर आपण पळून गेलो नसून आपल्याला पळविण्यात आल्याने ललितने सांगितल्याने या आरोपाला काहीशी पुष्टी मिळत आहे. तसेच त्याच्या कथित पलायन नाट्यानंतर तो नाशिक येथे सुरुवातीला काही दिवस लपून बसला होता, ही बाबही या आरोपाला आणखी बळकटी देत आहे.

तो पकडला गेल्यानंतर पुण्यातील कसब्याचे कॉंग्रेस (Congress) आमदार रवींद्र धंगेकर यांनी यात काही आजी, माजी पोलिस अधिकारीही सामील असल्याचे वक्तव्य करून मोठी खळबळ बुधवारी उडवून दिला. ललितच्या जिवाला कोठडीतही धोका होऊ शकतो, अशी भीती त्याच्या कुटुंबाने व्यक्त केली आहे.

दरम्यान, ललित पकडला गेला असला, तरी त्याला पळायला कोणी मदत केली होती ? महायुती सरकारमधील कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद त्याला होता ? रुग्णालयातून ड्रग पुरवण्याचे धंदे कसे सुरू होते ? ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे राज्यात कुठपर्यंत पोहोचलेले आहेत ?... असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, असे विरोधी पक्षनते विजय वडेट्टीवार म्हणाले.

त्यामुळे या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. ललित पळालेल्या ससूनच्या वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य काय आहे हे राज्यातील जनतेसमोर यायला हवे, अशी पोलिस (Poilce), रुग्णालय, राज्य सरकारला अडचणीत आणणारी विचारणा त्यांनी केली. हा एक ललित पकडला असला, तरी असे अनेक "ललित" अजूनही मोकाट आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याला तुरुंगात टाकून सर्व प्रकरण मिटले हा आव सरकारने आणू नये, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT