Pravin Darekar
Pravin Darekar Sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंदसाठी दमदाटी केली...

Amit Awari

मुंबई : उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकर्‍यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या व काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून आज राज्यभर आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज प्रसिद्धीपत्रक काढून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. Leaders of Mahavikas Aghadi brought pressure for bandh...

प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्याच घरातील वस्तूंची तोडफोड करून, स्वतःच्याच घराला कुलुप लावून, स्वतःच्याच लेकराबाळांना-मुलीबाळींना दमदाटीने घरात बसवून बंद यशस्वी ठरल्याचा कांगावा केला आहे. सरकारी यंत्रणांमार्फत बंद करण्याचा महाविकास आघाडीने केविलवाणा प्रयत्न केला. राज्यात सरकार पुरस्कृत बंद कधीच झाला नव्हता, मात्र तो विक्रमही महाविकास आघाडी सरकारने करून दाखवला. लखीमपूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो, मात्र राजकीय स्वार्थासाठी राज्य सरकार या घटनेचा वापर करीत आहे, अशीही टीका दरेकर यांनी केली.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, नागपूरचे गोवारी हत्यांकड, मावळमधील शेतकरी गोळीबार, पालघरचे साधू हत्याकांड यावेळी याच नेत्यांचा सहभाग असलेल्या सरकारची संवेदनशीलता कोठे गेली होती. दोन वर्षे महाराष्ट्र नैसर्गिक आपत्तींशी आणि कोविडशी झुंजत आहे. शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी त्यांचे व्यवहार ठप्प करण्याचा सरकारचा हा प्रयत्न निषेधार्ह आहे. आजचा हा बंद सरकारपुरस्कृत असून त्यात सहभागी होण्यासाठी व्यापारी संघटनांनी सत्ताधारी नेत्यांकडून दमबाजी करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या, हे अजबच आहे, असेही दरेकर म्हणाले.

बंदच्या काळात आज मुंबईत अज्ञात व्यक्तींकडून 8 बसेसची तोडफोड करण्यात आली. एकतर सरकारी यंत्रणा वापरुन, दबाव निर्माण करून बंद यशस्वी करण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षांकडूनच असे प्रकार होत असतील तर याचा अर्थ गाव बंद करू न शकलेला काडीपैलवान आपल्या घरातील वस्तूंची तोडफोड करून, आपल्याच घराला कुलूप लावून, आपल्याच लेकीबाळींना दमदाटी करून घरात बसवून बंद यशस्वी झाल्याची टिमकी वाजवीत आहे, अशी खिल्ली दरेकर यांनी उडवली.

एकाबाजूला नवीन इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन करायची आणि दुसऱ्या बाजूला बसेसची तोडफोड करायची, यावरुन या सरकारला जनतेची किती काळजी आहे तेच दिसते, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT